घड्याळ...!

घड्याळ जीवनाचं

संपत आहे जीवन आपुले घड्याळाच्या काटेवर,,
व्यर्थ गोष्टींचाच भडिमार होत आहे आपल्या या वाटेवर...

या वाटेवर कुणी दुसरेच आपलं होऊन जाते,,,
आणि आपलेच मायबाप आपल्यालाच परके होऊन जाते...

इथली वृद्धाश्रमे ही गच्च होऊ लागली,,,
पण त्या पोटच्या पोराने कधी त्यांची वाट नाही पहिली.....

कष्ट करून करून बाप आपला लेकाला शिकवतो,
पोरगा पण शिकतो, पण स्वतः च्या बापालाच विकायला निघतो...!

बापानी कधी सुपारीचे खांड सुद्धा चखलेलं नाही,
पोरगा मात्र व्यसनाच्या नोंदीची भरतो इकडं वही....

नका वागू हो असं, जीव आपला मोलाचा,,
आयुष्याची वाट लावून, लागेल दिवा तेलाचा..!

काय होत असेल त्यांची अवस्था पोराचे वागणं पाहून?,,,
दुसरं काही नाही, पण मृत्यु च्या वाटेकडे बाप जातो वाहून....

शेवटी फक्त ओसाडलेलं आयुष्य राहतं,
ते ही आपल्या म्हातारपणाची वाट पाहतं..!

मग काय कर्माची फळ आपली, भोगावी तर लागणारच,
आपल्याला ही मुलगा असेल, तो ही आपल्याला त्रास देणारच...!

विचार आपले असतात, कर्तव्य ही आपलेच असतात,,,
मग का कुणास ठाऊक, लोक असे का करतात......??

                             -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!