मुंबई एक न पाहिलेलं स्वप्न.....!
GAVRAN SMART BOY IN THE MUMBAI....! लहानपणी tv मध्ये सतत पाहिलेलं एक शहर, खूप काही भावना, स्वप्न आणि भविष्य होत ह्या शहराबद्दल माझ्या मनात, किती सुंदर असेल ना! हिरो, हिरोईन पण किती जवळून पाहायला भेटतील ना! भारी भारी गाड्या, गगनचुंबी इमारती, वाव कित्ती मज्जा येईल ना तिथे जायला!!!!!!! दर शनिवार - रविवारी दूरदर्शन वर लागणाऱ्या चित्रपटात पाहून या सर्व भावना मनात गोंधळ घालायच्या! मग काय मनातल्या मनातच अक्खी मुंबई फिरून यायचो मी. माहिती नव्हतं कधी जाण्याचा योग ये ईल का नाही ते सुद्धा, आणि कदाचित परिस्तिथीमुळे कधी मुंबई ला जाण्याचं स्वप्न हि पडलं नसावं किंवा बघितलं नसावं. करण मुंबई म्हंटल तर पैसा जवळ असावा लागतो आणि पैसा म्हंटल तर तो आपल्याकडे कुठंय????? असा प्रश्न पडून मुंबई ला जायचं या स्वप्नाने कधी डोकच वर केलं नाही. पण असेच tv मध्ये मुंबई बघता बघता प्रत्यक्षात मुंबई बघण्याचा एकदा योग आला, तेव्हा मी आठवीच्या सेमी मध्ये शिकत होतो. ऐन घटक चाचणी च्या दरम्यान हा योग आलेला! म्हणून कस करावं हा मोठा प्रश्न पडला. अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असल्या कारणाने शाळा फक्त एक formality ह