Posts

Showing posts from March, 2017

नववर्ष आनंदाचे...!

मराठी नववर्ष..! नव वर्षाच्या या मंगल वारी,, बांधून गुढी तोरणं दारी...! उस्तव आपला, माय मराठी,, मुखी विरघळते गोड गाठी..! गूळ हा गोड गोड, कडू तो पाला,, संकल्प करा आता, नेहमी सत्त्य बोला...! श्रीखंड पुरी मजेत गिळू,, संकल्प आपला न मोडता पाळू...! करू नववर्षाची नव्याने सुरवात,, नेहमी देऊ सत्याची साथ...!                     - ग. सु. डोंगरे          (नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)

सकाळ न्यारी

* सुमंगल प्रभात * सकाळ च्या या मंगल समयी फूलते अंगणी सुगंधी कळी । भोळा संत गातो भक्ति गीतं लाउनी चंदनाचा टीळा भाळी ।। गाती पक्षी ही बोबडे चिव चिव करीत मधुर स्वरांनी । लव लवती ती रोपटे डोलते टाळी वजवत पानांणी ।। सूर्य नारायण बघतो टाकत छटा केशरी रंगाची । चम चम लख लख करते हिरवी शाल ही पृथ्वीची ।। उघडावे अपुले डोळे येता सूर्य देव तो ऊरी । बोलत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ।।           * सुप्रभात *                -- * ग. सु. डोंगरे * 🤓

कॉलेज...!

कॉलेज चा कट्टा...! एक दररोजचा तिच्या सोबतचा प्रवास!! दररोज सकाळी लवकर उठायचं पटा पाटा अवरायचं स्टॉप वर जायचं आणि तिची वाट पाहात बसायचं....! तीने मात्र तिच्या वेळेवरच यायचं आपन मात्र तिची वाट पाहात कोवळ्या उन्हात तळत राहायचं कॉलेज ला जाताना मी तिच्या सोबतच रहायचं नाव तिच बस असायचं...! तिच माझी सोबती नाव तीच एसटी असायचं..! कॉलेज ला उतरायचं उतरताच ऐश्वर्या, दीपिका, कैटरीना, यांचे बिना मेकअप चे चेहरे बघत चालायचं..! बिल्डिंग च्या गेट वर पोचलो की शीपुर्डया ने आय कार्ड विचारायचं आय कार्ड आहे बॅग मधे अस खोट नाटक करुण मनातल्या मनात याच्या आयचा घो,, अस म्हणत आत निघुन जायचं...! क्लास मधे जाताच सगळ्या ना एक गुलाबाच्या फुलासारखी स्माइल देऊन आपल्या बाकावर जाउन बसायचं..! थोड़याच वेळात मास्तरानी जीव घ्यायला यायचं एक दिड तास त्यांच लेक्चर देऊन आपल्या डोक्याला अभाळाएवढ टेंशन देऊन जायचं...! एका पाठोपाठ एक अशे तीन चार लेक्चरांच राजकारण चालत राहायचं ते कसबस संपाउन मग क्लास मधल्या मित्रांना बोलायचं झालेल्या गोड भुतकाळातल्या गोष्टींची माळ जपत बसायचं.....! हळू हळू पोटातुन वेग वेगळे प्र

शिवजयंती...!

झाली काल शिव जयंती 🚩 मस्त, झक्कास, सुपर,,,, खरच राजे।। ३८५ वर्ष झाले तुम्ही जाऊन। अजुन पण इतके फ़्यान आहेत तुमचे। जल्लोशाने नाचत होते काल मिरवनुकित। आयला अस वाटत होत की खरच गर्व आहे की इतके मावळे आहेत आपल्या गावात। मग एक प्रश्न पडला?❓ जर एवढे मावळे आहेत तर का हे सगळ घडतयं????~ (भृष्टाचार,बलात्कार,जातिवाद,गरीबी,लाचारी,दुष्काळ ई.) मग थोड़ा विचार केला।।। बरकाइने लक्ष्य घातलं।। निरीक्षण केलं।।। मग काय??.... काल माहाराजांचि मिरवणूक। त्यांच्या मुर्तिला ठेवण्यासाठी रथ आनला होता। सर्व प्रथम DJ अनला, ६ बेस चा। नंतर मावळे तयार झाले, खरतर त्याना मावळे म्हणता येनारच नाही। झाले तयार, भगवे फेटे, पांढरे कपड़े कपाळी चंद्र कोर ई. हजार वेळा अरशाला विचारत.. मी कसा दिस्तोय? मिरवणूक बघनाऱ्या पोरी माझ्याकड बघतील ना.. अवरल.. मग रथ सजवला। महाराजांची मूर्ती रथात थेवायची होती। मग काय उचल्ली मूर्ती, माझ निरीक्षण चालूच, काय करणार 🚩राजा शिवछत्रपती🚩 परीवारातला ना मी. अहो काय सांगू हो.. तीळ् मात्र आदर दिला नाही हो या नालायकानी..| अहो पायात बुट चप्पल तशिच आणि उचल्ली हो राजेंची मूर्ती।। त

बाप माझा..!

बाप माझा शेतकरी शेतामंदी राबतो तडजोड त्याची भाकरी साठी,, जग हे चालेल कसे? म्हणून बांधतो तो प्रपंच्याच्या गाठी..! दुष्ट हि जनता ना कुणाला त्याची चिंता,,, तो चालतो ज्यांच्या साठी तेच करिती त्याची निंदा....! तो देवही कोपतो ना विझवतो, कधी तो धरणीची आग,, तो बिचारा साफ मनाचा भक्ती करितो, करून डोळ्याची जाग..! भाव त्याच्या संपत्तीचा ठरवितात दुसरेच,, तो मात्र गप्प असतो अस्तित्व आपले, शोधत तिथेच...! कोण याकडे लक्ष्य देईल? होईल माझा बाप मोकळा,,,,, वाट याची पाहून तो ही लावतो फासास गळा...!                      -- ग. सु. डोंगरे

गरिबी....!

हे भगवंता , नको बनाऊ रे कुणाला गरीब/भिकारी... लाज वाटते स्वतः ची, जेव्हा नजर जाते त्यांच्याकडे.... जे पैश्याने माजलेले आहेत त्यानाही शिकव ना, जरा चांगले धडे.... जीव कासाविस होतो रे, जेव्हा कुणी पोट भरवन्यासाठी भाकर माघत असते... ज्याना अन्नाची कदर नाही, बर झाल असत जर त्याना ही भीक माघुन खायचे दिवस दाखवले असते..... जो खुप श्रीमंत आहेत, तोच पैसा कमवतोय, पण जो गरीब आहे, भुकेवाचुन मरतोय... त्याच श्रीमंताना जरा दान धर्माची पद्धत शिकवली असती तर बर झाल असत,, निदान आजच्या गरीबाला भीक माघन्याची वेळ तरी आली नसती... देवा....! तु अक्खा मानुस चालवतो रे,, पण का कुनास ठाऊक कधी हा विचार का केला नाहिस, की एकदा मानसांचे विचार करण्याचे दृष्टिकोण चालवले असते... मानसाला जगन्यासाठी प्राणवायु पेक्षा आज च्या जगात चांगल्या विचारांची गरज आहे, बघ तेवढ़ करता आल तर बर झाल असत... कारण एकदा चांगले विचार आले की, प्राण वायु आपोआप उपलब्ध होईल.....!                        --- ग. सु. डोंगरे

कौतिक तिचे

कौतुक तुझे गोर गोमटं रूप तुझे गोरे गोरे गालं गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं.. मासोळी वाणी डोळं तुझं करत माझे हालं गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं.. कोळशा वाणी केस काळे, बो, रे लाले लाल गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं... अंगुरा वाणी ओठ तुझे करते मला ओलं गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं... हात तुझे कपसावाणी नरम लई सोलं गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं... पाय तुझे मोरपिसं भारी त्यांचा तोलं गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं... दिसती तू ग परी वाणी कौतिक तुझ केलं गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं...                              -- ग. सु. डोंगरे

घड्याळ...!

घड्याळ जीवनाचं संपत आहे जीवन आपुले घड्याळाच्या काटेवर,, व्यर्थ गोष्टींचाच भडिमार होत आहे आपल्या या वाटेवर... या वाटेवर कुणी दुसरेच आपलं होऊन जाते,,, आणि आपलेच मायबाप आपल्यालाच परके होऊन जाते... इथली वृद्धाश्रमे ही गच्च होऊ लागली,,, पण त्या पोटच्या पोराने कधी त्यांची वाट नाही पहिली..... कष्ट करून करून बाप आपला लेकाला शिकवतो, पोरगा पण शिकतो, पण स्वतः च्या बापालाच विकायला निघतो...! बापानी कधी सुपारीचे खांड सुद्धा चखलेलं नाही, पोरगा मात्र व्यसनाच्या नोंदीची भरतो इकडं वही.... नका वागू हो असं, जीव आपला मोलाचा,, आयुष्याची वाट लावून, लागेल दिवा तेलाचा..! काय होत असेल त्यांची अवस्था पोराचे वागणं पाहून?,,, दुसरं काही नाही, पण मृत्यु च्या वाटेकडे बाप जातो वाहून.... शेवटी फक्त ओसाडलेलं आयुष्य राहतं, ते ही आपल्या म्हातारपणाची वाट पाहतं..! मग काय कर्माची फळ आपली, भोगावी तर लागणारच, आपल्याला ही मुलगा असेल, तो ही आपल्याला त्रास देणारच...! विचार आपले असतात, कर्तव्य ही आपलेच असतात,,, मग का कुणास ठाऊक, लोक असे का करतात......??                              -- ग. सु. डोंगरे

राजा शिवछत्रपती..!

राजा माझा छत्रपती!! गर्वाने बोलते आजही इथली माती,,, माझा राजा शिवछत्रपती... सह्याद्री च्या कऱ्या कपारी घुमतो आवाज, हर हर महादेव,,,, याच आवाजाने बनतात मराठी अतूट नाती, माझा राजा शिवछत्रपती.... मावळे जमा करून स्वराज्य स्थापन करण्याची होती ज्या ची ख्याती, असा माझा राजा शिवछत्रपती.... स्वराज्याचा आधार तो , शेतकऱ्या चा बळीराजा तो, त्यांच्या साठीच झिजविल्या त्यानी तलवारीच्या पाती, असा माझा राजा शिवछत्रपती..... क्षत्रिय कुलावतंस म्हणता सळसळते रक्त भूवरी, नाव घेता त्या राजाचे शहारे येतात अंतरी, राजा एकच होता गडपती, अश्वपती,,, तो माझा राजा शिवछत्रपती.....                     --  ग. सु. डोंगरे

नाते आपले निसर्गाशी जिव्हाळ्याचे ठेऊ..!

फुल किती गोड असत, पण आयुष्य त्याच थोडं असत...! फुलाचं आणि मानवाचं काही वेगळंच नातं, फुल दोनच दिवस जगत, मात्र एक आगळीच ओढ लावून जात..! गुलाबाचा सुगंध आता बाटलीत येऊन पडलाय, म्हणून आता गुलाब मात्र रस्त्यावर जाऊन सडलाय!! नारळाचे पाणी आता पडत मारूतीच्या माथी..! कारण कोकोनट ऑइल आता भेटतय ना आपल्या हाती..! गोड-गॉड ऊस आपला मशीन मध्ये जाऊन चेपला, पण बघा ना, आपण त्याचा रस किती आनंदाने चाखला..! जमिनी वरची झाड आता , कुंडी मधे आली! त्यातच मानवाने झाड लावण्याची हौस पूर्ण केली. कुंडी मध्ये कोंडी त्याच्या वाढण्याची झाली, प्रदूषणाची वाढ होऊन, झाली जनता दवाखान्याची वाली..! मोठं मोठे नेते आता वृक्षा रोपण चा कार्यक्रम हाती घेतात, वृक्षा रोपण करण्या साठी,  जंगले सगळी तेच तोडायला लावतात. प्राण वायू संपून संपुन शेवट त्याचा येईल, नंतर आपल्या आयुष्याची दशा कशी होईल?.. म्हणून म्हणतो, नाते आपले निसर्गाशी जीव्हाळ्याचे ठेऊ, "निसर्गाची काळजी घेईल"! शपथ अशी घेऊ.       शपथ अशी घेऊ.....!    !!! !!!!!!!!!!!!धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!!                                - ग. सु. डोंगरे

दुष्काळ

दुष्काळाच्या झळा किती सोसते ही धरणी या दुष्काळाच्या झळा पाण्यावाचून सुकलाय इथं शेतकऱ्याचा मळा या सरकार पण लावतं वेगळाच लळा 5 वर्ष कापतो तो आपल्या जनतेचा गळा झाडे तोडून तोडून इथं शिजतात मटण माझ्या धरती वरच्या पाण्याची पातळी एकदा पूर्ण पणे घटनं..! शेतकरी आमचा राजा,आता झाला तो भिकारी पाण्या साठी हिंडतात वन वन त्याची पोर सारी ना अंगाला भेटतात चिंध्या ना भेटत एखादं लुगडं, गरीबीने इथं केलं आता त्यांनाच नागडं किती ओरडून ओरडून सांगू मी त्यांची ती व्यथा?? पाण्यावाचून सुकलाय देश सारा काय सांगू त्याची कथा?...! अरे वाचवा त्या राजाला ह्या दुष्काळाच्या झळा पासून, हळू हळू घेत आहे तो आपलंच अस्तित्व पुसून..! सोसून सोसून गळा आपला लावला त्याने फासाला, आता त्याचेच लेकरं शोधत आहेत पाणी त्याच्या दिवसाला,     पाणी त्याच्या दिवसाला.....!                            -- ग. सु. डोंगरे

संघर्ष

जीवन एक संघर्ष खूप कठीण असतात काही गोष्टी सगळं असून देखील समाधान नसत गरजा आपल्या भागत नाही म्हणून दुसऱ्याचे लुगडे धुवावे लागतात का दिल देवाने असे आयुष्य? ज्यात बिलकुल चव नाही अशी कोणतीच गोष्ट नसेल जिची आम्हाला हाव नाही जीव तरसून जातो ती चॉकलेट ची आईसक्रीम खायला पण खिशात नसते पैसे तिचा वास देखील घ्यायला नोकर दार म्हणून राहणं सोपं नव्हे त्यात ही खूप कष्ट सोसावे लागते हक्काचे पैसे जरी माघितले तरी आपल्यालाच हाकलून दिले जाते कुठपर्यंत असाच डाव चालत राहणार? कधी मला मनसोक्त जीवन जगायला भेटणार? हा प्रश्न कधी नाही सुटणार..! यातच माझं आयुष्य पूर्णपणे संपणार..!                       -- ग. सु. डोंगरे