बाप माझा..!

बाप माझा शेतकरी

शेतामंदी राबतो
तडजोड त्याची भाकरी साठी,,
जग हे चालेल कसे?
म्हणून बांधतो तो प्रपंच्याच्या गाठी..!

दुष्ट हि जनता
ना कुणाला त्याची चिंता,,,
तो चालतो ज्यांच्या साठी
तेच करिती त्याची निंदा....!

तो देवही कोपतो
ना विझवतो, कधी तो धरणीची आग,,
तो बिचारा साफ मनाचा
भक्ती करितो, करून डोळ्याची जाग..!

भाव त्याच्या
संपत्तीचा ठरवितात दुसरेच,,
तो मात्र गप्प असतो
अस्तित्व आपले, शोधत तिथेच...!

कोण याकडे लक्ष्य देईल?
होईल माझा बाप मोकळा,,,,,
वाट याची पाहून
तो ही लावतो फासास गळा...!

                     -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!