शुभ मंगल सावधान....!


खरच ही घड़ी इतकी घातक असते..! आजपर्यंत कळालच नाही, शुभमंगल सावधान म्हंटल्यावर मुठितला अक्षदा समोर फेकायचा इतकेच माहिती होते. पण आज लग्नाच वय झाल तेव्हा कुठे कळतय की प्रत्येक लग्नात गेल्यावर बुवा आवर्जून सांगतो की "सावधान" ह्याचा अर्थ असा की प्रत्येकची वेळ येईल सावधान रहा....!

बरं सावधान तर सावधान पण का?
शुभमंगल आहे, दोन मन एकमेकांशी जुळनार आहेत, सर्व परिवार एकत्र येणार, मज्जा मस्ती दोन परिवार एकमेकांशी तड़जोड करून का होईना पण एकमेकांशी नाते सबंध बांधनार, सगळीकडे आनंदी आनंद माजनार,,,,,, तरी पण का??? का सावधान व्हायचं?????

खुप दिवस ह्या प्रश्नांनी डोक्यामधे नंगानाच केला,
           थोड़ा काळ गेला, हळू हळू बुद्धिमधे प्रकाश पडला मग कळालं की का सावधान ते,,
          अर्थातच लग्न आणि लग्नानंतरच सुखी जीवन हे सहजासहजी नाही मिळत म्हणून सावधान रहा....!
           बाप पोरीसाठी एक न एक घर, गाव, एवढंच नाही तर बरेचशे ऊंबरठे झिजवतो, का तर मुलगा चांगला असावा, त्याच्या घरी शेती असावी, त्याचे नातेवाईक चांगले असावे, घर आसावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सरकारी नोकरी असावी, चार लोकं चांगला म्हंतील असा मुलगा असावा....!
           एवढं सगळ ज्या मुलाकडं आहे त्याला कुठलीही पोरगी मिळेल, अगदी त्याला हावी तशी!

          पण मला कळत नाही, मुलगा चांगला असावा! चांगला म्हणजे कसा नेमका कळेल का हो???.. फक्त त्याच्या घरी दारी सगळ आहे म्हणून?? तस म्हंटल तर ते सगळ त्या मुलाच्या बापाच झालं,, त्याच काय?? चांगला म्हणजे दिसायला चांगला का? अस म्हंटल तर कुरूप दिसनारी मूलं तशीच बिनलग्नाची राहतात का? मग नक्की चांगला म्हणजे कसा??

          घरी शेती असावी,, बर ठीक आहे शेती आहे, पण त्यात ना तो मुलगा शेतात काम करतो ना ती मुलगी काम करणार आहे! मग का हावी आहे शेती? समाधी बांधायला!?? मुलगा नोकरीवाला वाला आहे ना, मग शेतीची काय आवश्यकता? शेतकरी मुलगा तर नको असतो तुम्हाला मग शेतीचं का धरुन बसता????

          मुलाचे नातेवाईक चांगले असावे! का?? तुमच्या घरातल्या व्यक्तिवर विश्वास नसतो काय? की ती त्यांच्या नातेवाईकांमधे सामाउन घेईल याचा?!

          सरकारी नोकरी, आता सरकार एवढं दयावान थोड़ी न आहे की म्हणेल "ये बाबा तुझ लग्न होईना तर नोकरिला लाग आणि लग्न कर!" अरे!!!!! नसते प्रत्येकची तेवढी क्षमता नोकरिला लगण्याची, पण याचा अर्थ असा तर नाही ना की तो तुमच्या मुलीला उपाशिच ठेवनार आहे, देवाने जगात आपल्याला पाठवलं म्हणजे त्याच सोबत आपल्याला जगण्याचे साधनही देवाने पाठवलेच असतील न!! देव नाहीये स्वार्थी.
          चार लोकं चांगला म्हंतील असा! आता ही चार लोकं कोण????? आणि काय भरवसा ती चार लोकं खरच बोलत असतील याचा???? आणि याचा ही काय भरवसा की लग्न करून दिल्यानंतर तो आधी होता तसाच आयुष्यभर राहिल?????
          देव जाने का अशी बुद्धि चलते लोकांची! मेहनत करून 4 पैसे कमवनारा मुलगा नको असतो, पण सरकारी ऑफिसात लाच घेऊन घरी येणारा पोरगा पाहिजे असतो लोकांना.पोरगा मेहनत करून घर घेणारा नको असतो, ऐतं बापाने बांधून ठेवलेलं घर पाहिजे असतं लोकना. गरीब घरातलं कष्टाळू, निर्व्यसनी नको असतं श्रीमंत घरातलं बिघड़लेलं लपून व्यसन करणारं हव असतं लोकांना.

           मला अस नाही म्हणायच की गरीब घरातील चांगल किंवा श्रीमंत घरातील वाईट, म्हंन्न फक्त एवढंच की चार लोकं, श्रीमंती, पैसा, शेती, घर य्या सगळ्या गोष्टी पाहण्या ऐवजी तो मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची वागणूक, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याची समाजप्रति भावना, त्याची कष्टाळू व्रत्ती, त्याचे शिक्षण इत्यादि गोष्टी योग्य असतील तर तो का नाही नविन घर घेऊ शकत? का शेती येणार नाही त्याच्याकडे? तुमची मुलगी भलेही पिज़्ज़ा, बर्गर, कैंडल लाइट डिनर करणार नाही, पण जी चटनी भाकर खाईल ती एकदम समाधनाने असेल.
           आजचा मानुस नेमका सगळ चांगल मिळन्याच्या नादात मानसिक सुखच हरवून बसतोय, लग्ना सारख्या एवढ्या मोठ्या गोष्टिसाठी एवढा कमी वेळ का द्यावा? भेटू द्या मुला मुलीला, मिळू द्या एकमेकांचे विचार, आहेत ते खंबीर एकमेकांच्या जिवनसाथी निवडन्यासाठी! पैसा आणि चांगले या गोष्टिसाठी अपण स्वतःच आपल्या मुला मुलींना मसिकतेच्या विळख्यात टाकतोय अस नाही वाटत का?  पैसा च सगळ काही नसून मानसिक समाधानाचा ही विचार करायला नाको का??? प्रेम समंधातुन लग्न केल्याने जर तुमचा अपमान होतो तर का तुम्ही लग्ना आधी प्रेम निर्माण होईपर्यंत वाट बघत नाही?? लग्न झाल्यानंतर आपोआप प्रेम होतं अस म्हणनारी ही काही महाभाग असतात, अहो पण लग्नानंतर प्रेम होण्याच्या लायकीची समोरची व्यक्ति असेलच याची शाश्वती देईल का कोणी???
           जा जउन भेटा जरा त्या मातेला जिचा नवरा तीला पुटुशी करून दुसऱ्या बाई सोबत कायमचा निघुन जातो.
           जा त्या मुलाकडे ज्याची दोन दिवस आधी झालेली बायको तिच्या प्रियकरासोबत निघुन जाते.
           जा त्या चिमुकल्यांकडे ज्यांच्या आई वडिलांची रोज मारामारी, भांडण होत असतात.
           आणि त्यांच्याकडे ही जा ज्याणी लग्न झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना व्रद्धाश्रमात पाठवलय.
           कारण तिथे ही कुणाची तरी मुलगी किंवा मुलगा हे दोन्ही घटक असतातच!

           'खऱ्या अर्थाने शुभ मंगला साठी सावधान होण्याऐवजी अवधान असायला हव म्हणजेच जागृत होण्याची गरज आहे.'


                                      --  ग. सु. डोंगरे
          
         
          
         
   
        

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!