Posts

Showing posts from September, 2018

मायेची ओढ....!

चार महिन्यानंतर जेव्हा बाहेर राहणारं पोर घरी जातं तेव्हा त्याचा आनंद काय असेल? हा आनंद अनुभवायला खूप काही सोसावे लागले, ते मेस चे जेवण, रोज रोज प्रवास करून कामाच्या ठिकाणी जाणं, रूम वर राहणं, सगळं काही वेळेवरच, पाहिजे तेव्हा काहीच नाही, अगदी बाहेरचं आयुष्य...!         नाशिक मधे उच्च पदवी चे शिक्षण घेऊन मुंबई सारख्या नगरी मधे समोरचं काही आयुष्य घालवण्यासाठी गेलो, तशी मुंबई म्हणजे माझ्या मनात काय, हे माझ्या 'मुंबई एक न पाहिलेलं स्वप्न' या लेखा मध्ये मी निरागसपणे मांडलेलं आहे..!     असो....            मुंबई म्हणजे माझ्या मनात एक वेगळाच तरंग होता, पण जेव्हा इथे आलो, आता मुंबईचं प्रत्यक्ष जीवन जगतोय, तेव्हा कुठे कळतं आहे की मुंबई खरी काय आहे! धकाधकीचे जीवन, रोज उठून नुसतं पळायचं, ट्रेन च्या वेळेवर आणि तालावर नाचायचं, बस्स रोजची ट्रेन पकडायची, त्याच वेळेची तीच ट्रेन, त्याच ट्रेन चा तोच डब्बा, त्याच डब्ब्यातली तीच सीट, एवढंच आयुष्य! दीड दोन तासाचा प्रवास पूर्ण करून कामाच्या ठिकाणी उतरायचं, उतरताना आणि चढताना मात्र रणांगणातील युद्धाचा प्रसंग असतो, सुखरूप चढलो किंवा उतरलो म्हणजे य