Posts

Showing posts from October, 2019

पणतीतला दिवा तो, मज साथ देत आहे....!

पणतीतला दिवा तो उजेड देत आहे,, मार्गावरी ही माझ्या मज साथ देत आहे...! गेली पळून भीति नादान या जीवाची,,, रात्री अमावसेच्या प्रकाश देत आहे...! नथांबनार मि आता पर्वा ना कुणाची,,, लेखनी हाती माझ्या ती शब्द देत आहे.....! शब्दात शब्द मांडुन करू सैर या जगाची,,,,, जग व्यर्थ जीवनाचा मज अर्थ देत आहे.....!                              -- ग. सु. डोंगरे

मि का असा आहे....?

मि का असा आहे कोना कधी कळलाच नाही,,, मन मनातला वारा कोना कधी वळलाच नाही....! मि स्तब्ध त्या ठिकाणी जिथप्यायला मी प्याला,,, तेथे असोनी जनता दिसलो कुणास नाही....! मि छेडीतो यमकांना मांडोनी चार ओळी,,,, मज ऐकूनीही समदे प्रतिसाद देत नाही....! मि रात्र चांदन्यांची तू चंद्र ध्रुव तारा,,,, पण रात्र अमावसाची चमकुच देत नाही....!                            -- ग. सु. डोंगरे

जागतिक मानसिक आरोग्य दिन....!

सर्वप्रथम सर्वाना जागतिक मानसिक अरोग्यदिनाच्या सुभेच्छा....!         आज १० ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन. कलियुगाच्या इतिहासात पहिले की लक्षात येईल की मासिक अजरांच थैमान प्रत्येकाच्या डोक्यावर कसे आहे.         समाजामधे वावरताना, कुठेही गेल की आधी हा प्रश्न विचारला जातो मला! "काय शिकतोय सध्या", "मानसशास्त्राचा अभ्यास सुरु आहे", असे जेव्हा उत्तर दिले जाते ना तेव्हा प्रत्येक जन हेच बोलतो की मस्त विषय निवडला, समाजामधे गरज आहे तुम्हा लोकांची !!         पण जेव्हा खरच गरज असते तेव्हा आपण काय करतो...?         जेव्हा आपल्या घरात, मित्राला, कधी नजरसे पडलेल्या एखाद्या व्यक्तीला काही मानसिक अजार असेल तर त्याकडे आपण कोणत्या नजरेने बघतो..??? जेव्हा आपला फैमिली डॉक्टर आपल्याला साइकोलोजिस्ट कड़े जायला सांगतो तेव्हा आपले विचार काय असतात...? शरीराला थोड़ी ईजा झाली की घाबरून जाणारे व्यक्ति आपण, मानसिकतेवर एवढे आघात होऊन आत्महत्येची वेळ येते तरिपण त्यावर आपण आत्महत्येशिवाय ठाम असा काही निर्णय घेतो का...??? का मांसिकतेच्या काळजीमधे हलगर्जिपना करतो आपन..?         या सर्व