Posts

Showing posts from November, 2017

एक नवा विवेकानंद.....!

माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या दरम्यानचा हा एक प्रसंग...! कॉलेज ला असताना मी आणि माझा मित्र रोज ग्रंथालयात अभ्यास करत बसायचो, खरतर मी फक्त अभ्यासाचं ढोंग करत असे, तो मात्र पक्का अभ्यासू...! सतत आमची हि गाडी चालू असायची, सर्व lectures झाले, कि सगळ्यांसोबत आणलेला डब्बा खायचा, आणि नंतर ग्रंथालयात जाऊन बसायचं, माझा मित्र, खूप sincere तो दिसण्यात हि, आणि वागण्यात सुद्धा, तसाच तो अभ्यास हि करायचा, पण मी मात्र दिस्तानाच टपोरी,, त्यात माझं वागणं आणखीनच टपोरी..! पण सगळ्यांना प्रश्न असा पडे कि इतका टपोरी दिसतो, पण हा ग्रंथालयात तासन-तास कसा बसतो, कारण टपोरी म्हंटल्यावर कट्ट्यावर बसणारं पोरग, पण माझं चित्र काही विचित्रच होतं, तसा मी मनाने साफ, आणि शुद्ध हेतू असणारा होतो, फक्त राहायला तस आवडतं,, म्हणून राहायचो..! तर अशाच आमच्या सतत चालणाऱ्या गाडी मधे अनेक प्रवाशी आम्हाला बघायचे, त्यातलाच हा एक..! ज्याचं नाव विवेक राजेंद्र खाडे... दररोज आमच्या दोघांचं निरीक्षण करे, हे आम्हाला कधी लक्षात नाही आलं, पण असच योगायोगाने, आमच्या वर्गामधे विवेक आणि त्याचा मित्र डब्बा खाण्यासाठी आले, आमचा clas