Posts

Showing posts from May, 2017

आयुष्य दावणीला बांधले...!

दावणीचे आयुष्य....! दावणीला जनावर दोरीनं जसे बांधले,,,, तशी माझी स्वप्नं बघा वेशीला टांगले....! स्वप्नांच्या या वाटेवर खंडीभर काटे,,,, बोचते ओ ठीक ठिकाणी आयुष्य होते छोटे...! चिंध्या चिंध्या साचून खमीज, इजार शिवले,,, पण दुष्काळानं या साऱ्या ठिगळं बघा लावले...! ना मिळाला मला थारा, ना माझ्या स्वप्नांना किनारा,,, काळ्या आईचा अन तापलेल्या गोळ्याचा आता या जीवाला सहारा.....! दावणीचे आयुष्य हे कधी राव संपेल,,,?? बेजारलेल्या या जीवाला, मोक्ष कधी मिळेल..??                         - ग. सु. डोंगरे

ये रे ये रे पावसा....!

पहिल्या पावसाचा पहिला थेंब...! पहिल्या पावसाचा पाहिला थेंब जेव्हा पडतो तेव्हा सगळ्यांची धांदल उडून जाते,,,, कुरडाया, पापड्या, खारोड्या, सांडाया यांची मात्र गाठोडी बांधली जाते...! लाहान लाहान मुले धुंद वेडे होऊन पावसाचा आनंद घेतात,,, मात्र, काही जण, काय पाऊस आहे हा... असं म्हणून छत्री च्या शोधात लागतात...! झाडांवरती साचलेली, अक्ख्या उन्हाळ्यातली धूळ चका चक करून पाणं चकाकते,,,, धरणी मातेची ताहान भागायची सुरवात तिथून होते...! खरच पावसाचा पहिला थेंब किती अजब असतो ना.....?! कुणासाठी पोटापाण्याचे मार्ग उघडे करून देतो,,,,! तर कुणाचं संकट बनून जातो...!                        -- ग. सु. डोंगरे

धून सुप्रभात....!

*धून सुप्रभाती....!* सुंदर ते ध्यान मणी पांडुरंग उभारुन दंग चांद्रभागी.....! हाती वीणा वाजे मुखी चाल बोले अंगी हरिनाम डोले भिमातीरी.....! नाथांचे मन श्लोक गाती पाहाटेच्या काळी कानी पडते भूपाळी गोदावरी तीरी....! रंग उधळतो अंगी कृष्णा वाजीतो बासरी धन्य अनंत सागरी भिमातीरी....! विठू विटेवरी उभा भाळी कपाळी कस्तुरी गंध दरवळे पंढरी चंद्रभागा....! माय माऊलीया माझी सुप्रकाळी या बोले मज स्नान घाले पंचगंगा....!            -- ग. सु. डोंगरे 🤓          💐   *(सुप्रभात)*   💐

रे पाखरा...! (नकारात्मक)

रे पाखरा...! रे पाखरा पाखरा,,, घे उंच तू भरारा....। नाही ठेवला इथे तुला,,, कोणीच रे निवारा.....।। रे पाखरा पाखरा,,,, जा पाहाडाच्या मंधी....। इथे तोडतायेत,,,, सगळे झाडाची ती फांदी....।। रे पाखरा पाखरा,,,, बघ तू आता पळवाटा....। इथली जनता विषारी,,,, झाली बाभूळाचा काटा...।। रे पाखरा पाखरा,,, तू होरे इथून फरार...। हि माणसे राक्षस,,,, देतील निरोप तुला अखेर.....।।                  -- ग. सु. डोंगरे                 (8605522285)

रे पाखरा...! (सकारात्मक)

रे पाखरा.....! रे पाखरा पाखरा,,, मन घुंगरू रे झालं...। बघ माझ्या शेतामंदी, कस हिरवं वाण आलं....।। रे पाखरा पाखरा,,, ये माझ्या तू अंगानी...। तुपा दुधात माखून, तुला देईल चारा पाणी.....।। रे पाखरा पाखरा,,, किती गोड तुझा आवाज...। जसे संगीताचा सूर,,, आणि कंठाला सोनेरी साज....।। रे पाखरा पाखरा,,, तू उनाड किती रे.....। माझे मन हि तुजसे,,,,, घेते धाव चोही रे.....।। रे पाखरा पाखरा,,,, सौंदर्य तुझं अप्रतिम....। जंगलातल्या सुळसुळणाऱ्या,,,, नागाची जशी चमचमती कातीन....।।                 -- ग. सु. डोंगरे               ( ८६०५५२२२८५)

जय महाराष्ट्र...!

महाराष्ट्र दिन....! इतिहासाच्या रक्ताने माखलेली इथली माती,,, गर्वाने बोलते आहे जय महाराष्ट्र न बाळगता कुणाची भीती.....! दिन भाग्याचा, आनंदाचा, दिन हा मंगलमय,,,, बोलतो इथला जण समाज महाराष्ट्र जय.....! मराठ्याची धरती ही, मराठ्याची वर्दी हि,,, हिंदूंची देवस्थाने, मंगल पावन धरती हि...! भगवा हातात घेऊन बोलतो इथे बच्चा बच्चा,,, हे राज्य व्हावे ये तो श्रींची इच्छा....! जय महाराष्ट्र....! जय जिजाऊ...! जय शिवराय....! जय शंभूराजे...!                      -- ग. सु. डोंगरे        (महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा)