Posts

Showing posts from October, 2017

Infernal मार्क्स हे शिक्षकांनी दाखवलेलं एक अमिशच असावे...!

महाविद्यालयातील इंटर्नल मार्क्स चा पारंपरिक घोळ...! शालेय वातावरण संपवून आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, तर सुरवातीपासूनच कोण-कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे आपल्याला ठाऊक आहे. होणारी धावपळ, होणारा त्रास, त्याच बरोबर आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची भीती, मला एक समजत नाही कि हे आवडतं म्हणजे नेमकं काय बरं?.. आपण तर त्याचा काही अनुभव घेतलेला नसतो मग ते आवडतं कस बनून जातं???           असो... एकंदरीत प्रवेश मिळाला!! पुढे काय ?  मित्र-मैत्रिणींबरोबर धिंगामस्ती, enjoyment असं अगदी मस्त असं आपलं जीवन चाललेलं असतं, पण त्यालाच कुणाची तरी दृष्ट लागत असावी, कारण या सर्व गोष्टी बरोबरच internal , external परीक्षा ह्या हि खूपच महत्वाच्या असतात.              यात नेमकं होत काय..! कि वर्षभर आपण जे काही lecture करतो ना त्यातुन आपल्याला खूप काही गोष्टी लक्षात येतात, ज्या शिक्षकांबद्दल असतात..! मग त्या शिक्षकाचे आपल्याला काही समजत नसेल, किंवा त्याला त्या विषयाचे कितपत ज्ञान आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आपण प्रवेश घेण्यासाठी भरपूर fee  भरतो, मग काही जण तो पैसा उसने घ