Infernal मार्क्स हे शिक्षकांनी दाखवलेलं एक अमिशच असावे...!

महाविद्यालयातील इंटर्नल मार्क्स चा पारंपरिक घोळ...!

शालेय वातावरण संपवून आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, तर सुरवातीपासूनच कोण-कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे आपल्याला ठाऊक आहे. होणारी धावपळ, होणारा त्रास, त्याच बरोबर आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची भीती, मला एक समजत नाही कि हे आवडतं म्हणजे नेमकं काय बरं?.. आपण तर त्याचा काही अनुभव घेतलेला नसतो मग ते आवडतं कस बनून जातं???
          असो... एकंदरीत प्रवेश मिळाला!! पुढे काय ?  मित्र-मैत्रिणींबरोबर धिंगामस्ती, enjoyment असं अगदी मस्त असं आपलं जीवन चाललेलं असतं, पण त्यालाच कुणाची तरी दृष्ट लागत असावी, कारण या सर्व गोष्टी बरोबरच internal , external परीक्षा ह्या हि खूपच महत्वाच्या असतात.
             यात नेमकं होत काय..! कि वर्षभर आपण जे काही lecture करतो ना त्यातुन आपल्याला खूप काही गोष्टी लक्षात येतात, ज्या शिक्षकांबद्दल असतात..! मग त्या शिक्षकाचे आपल्याला काही समजत नसेल, किंवा त्याला त्या विषयाचे कितपत ज्ञान आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आपण प्रवेश घेण्यासाठी भरपूर fee  भरतो, मग काही जण तो पैसा उसने घेऊन भरतात, तर काही घरच विकून भरतात, तर कोणी खूप मेहनत करून भरतात. अशा रीतीने फी भरलेली असून जर अपल्याला वर्गातल्या शिक्षकांचं समजत नसेल अथवा शिक्षक नुसता वाचून दाखवतोय, जे कि आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. मग आपण भरलेल्या फी च्या मोबदल्यात ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिळवण्याचा हक्क आपल्यला असतोच ना..?
          हक्क असतो ओ.... पण तो मिळवता येत नाही, कारण आपण या गोष्टीवर आवाज उठवावा तर आपले internal मार्क शिक्षकांच्या हातात असतात, आपण जर काही बोललो तर आपल्याला मार्क कमी देतील या भीतीने गप्प बसून सगळं काही सहन करावे लागते. कारण शिक्षकाविषयी तक्रार करावी तर तो आपल्याला कमी मार्क देईल, एक वर्ष वाया जाईल, या भीतीने आहे त्या स्थितीत गपचूप सहन करावे लागते.
मग हे internal मार्क्स असतात नेमके कशासाठी? कॉलेज चा स्कोर वाढवण्यासाठी का विद्यार्थ्यांना अमिश दाखवण्यासाठी??....
इतकी फी भरून पाहिजे ती सुविधा मिळत नाही, त्यावर आवाज उठवला तर मार्क मिळणार नाही. या  भीतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊन पश्चातापाची भावना निर्माण होते, सुरवातीला अवडत होत तेच कॉलेज आता नरकासारखं वाटायला लागतं.सर्व काही हक्काचे असून देखील मागता येत नाही. या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना समजत नाही करावं काय, कारण बाहेरच्या classes साठी सगळ्यांकडेच पैसा नसतो, मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्याने काय करावं हा मोठा प्रश्न पडतो.....!मार्क्स म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्याला दाखवलेले अमिशच असावे...!
जसे इयत्ता ९ वी च्या infernal बंद करून त्यांना फक्त थेअरी १०० गुणांचा देणार आहेत, तसेच संपूर्ण बाबतीत विचार शिक्षण संस्थेने करावा, याने महाविद्यालयाचा गुणांक कमी येऊ शकतो, पण महाविद्यालयातून पास होऊन येणारे विद्यार्थी हुशारातलेच असतील..!

                       -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!