Posts

Showing posts from December, 2019

घडवनुक....!

महाराज आम्ही नेमके कुठे कमी पडलो सांगता येत नाही....! काही दिवसापूर्वी घडलेला एक प्रसंग, सहज पाहुण्यांच्या घरी गेलो, सगळ्यांना भेटून बरं वाटतं, म्हणून अधुन-मधून अशा चकरा सुरुच असतात. चहा पाणी झालं थोड्या गप्पा गोष्टी झाल्या, संध्याकाळच्या जेवनाची वेळ काही मिनिटांवरच होती त्यामुळे घरातील महिलामंडळ जेवण तयार करण्याच्या तयारीला लागल होतं. तेवढ्या वेळेत काय करणार??? मग आमचे बाल मानसशास्त्र जरा जागे झाले, आणि नंतर पाहुण्यांच्या लेकरांसोबत बसलो, वय वर्ष ३ ते १० या दरम्यानची चार-पाच कारटी धिंगाना घालत होती, आणि मी मात्र नेहमीप्रमाने निरीक्षण करायला भिड़लो, आणि त्याच दरम्यान मी माझा मोबाइल काढून बजुच्या टेबलावर ठेवला, हळूच त्यातला तो दुसरितला मुलगा माझ्या मोबाईल जवळ आला आणि त्याने मोबाइल घेतला आणि त्याने लॉक उघडण्याचा प्रयत्न करायला सुरु केला, तमोबाइलला पासवर्ड असल्यामुळे त्याला उघड़ने जरा अवघड झाले, त्यातही त्याने मनात आलेले चार पाच पासवर्ड टाकूनही पहिले, शेवटी माझ्याकडे आला आणि हळूच मला म्हणाला "दादा लॉक उघडून दे ना" मी त्याच्या हतातून मोबाइल घेतला आणि खिशात ठेऊन दिला. त्यानंतर मात्