घडवनुक....!

महाराज आम्ही नेमके कुठे कमी पडलो सांगता येत नाही....!

काही दिवसापूर्वी घडलेला एक प्रसंग, सहज पाहुण्यांच्या घरी गेलो, सगळ्यांना भेटून बरं वाटतं, म्हणून अधुन-मधून अशा चकरा सुरुच असतात. चहा पाणी झालं थोड्या गप्पा गोष्टी झाल्या, संध्याकाळच्या जेवनाची वेळ काही मिनिटांवरच होती त्यामुळे घरातील महिलामंडळ जेवण तयार करण्याच्या तयारीला लागल होतं. तेवढ्या वेळेत काय करणार??? मग आमचे बाल मानसशास्त्र जरा जागे झाले, आणि नंतर पाहुण्यांच्या लेकरांसोबत बसलो, वय वर्ष ३ ते १० या दरम्यानची चार-पाच कारटी धिंगाना घालत होती, आणि मी मात्र नेहमीप्रमाने निरीक्षण करायला भिड़लो, आणि त्याच दरम्यान मी माझा मोबाइल काढून बजुच्या टेबलावर ठेवला, हळूच त्यातला तो दुसरितला मुलगा माझ्या मोबाईल जवळ आला आणि त्याने मोबाइल घेतला आणि त्याने लॉक उघडण्याचा प्रयत्न करायला सुरु केला, तमोबाइलला पासवर्ड असल्यामुळे त्याला उघड़ने जरा अवघड झाले, त्यातही त्याने मनात आलेले चार पाच पासवर्ड टाकूनही पहिले, शेवटी माझ्याकडे आला आणि हळूच मला म्हणाला "दादा लॉक उघडून दे ना" मी त्याच्या हतातून मोबाइल घेतला आणि खिशात ठेऊन दिला. त्यानंतर मात्र त्याचे सूत्रच बिघडले तो काही माझ्या मोबाइल ला सोडायला तयरच नव्हता, आणि लहान मुलांकडे मोबाईल देणं म्हणजे आपण त्याना स्वतःच अधोगतिकडे नेण अस मला वाटत, त्यामुळे मी लहान मुलांकडे मोबाइल देण तेवढ नेहमी टाळत असतो.
         असा बराच वेळ त्याने मी त्याला मोबाइल द्यावा म्हणून माझ्यासोबत हुज्जत घातली, पण मी मात्र मोबाईल दिला नाही. थोड़ा काळ गेला आणि माझ लक्ष भिंतिवरच्या एका प्रतिमेकडे गेली. ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, आणि नकळत मी त्या प्रतिमेला प्रणाम केला. हे सगळ तो दुसरितला मुलगा बघत होता, ते पाहुन त्याने काहीच प्रतिक्रिया दीली नाही. पण परत मोबाइलच्या माघे लागला, मग मी म्हंटल "देतो तुला मोबाइल, पण त्याआधी मी जे विचारेल ते सांगायचं," तो म्हणे "ठीक आहे". त्यानंतर मी महाराजांच्या प्रतिमेकडे बघून विचारले "हे कोन आहेत?" त्यावर तो लगेच उत्तरला "शिवाजी महाराज". नंतर मी दूसरा प्रश्न केला, यांच्या "आईचे नाव काय?" यावेळी मात्र त्याला काही आले नाही. नंतर मी परत एक प्रश्न केला, "यांनी काय केले?"  त्यावर तो म्हणाला "शत्रुंचा नाश केला." मग मी पुढचा प्रश्न करणार तेवढ्यात तो उद्गारला, "हे काय विचारतो, मोबाइल मधल विचार काहीपन सगळ सांगतो म्हणे मी," आणि एका दमात त्याला मोबाइल मधल्या येणाऱ्या सर्व गोष्टी संगीतल्या. मी मात्र तिथेच कोसळलो, कुठे कमी पडतो आपन याची जाणीव त्या लहाणग्या मुलाने करुण दीली.
         खरतर किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, की घरात लहान मुलांना आपन काय माहिती देतो, आणि त्याना कसे घड़वतो!
         मुलांना आपन छत्रपती शिवाजी महाराज या नावाबद्दल काय शिकवायला हवे, हे सांगणे म्हणजे लाज वटन्यासरखी गोष्ट आहे.
         महाराजांनी शत्रुंचा नाश नव्हे तर स्वराज्य स्थापन केले. महाराजांची प्रतिमा आपन काशी अभी करायला हवी, या बद्दल थोड़ी तरी जाणीव आहे का आपल्याला? आपण फक्त घराच्या भिंतिवर महाराजांची प्रतिमा लावतो, पन मनाच्या घरामधे ती प्रतिमा लवायची विसरूनच जातो. यावरून लक्षात येते की आपणच आपल्या मुलांना किती अधोगतिकडे घेऊन जात आहोत. आपण आपल्या मुलाना कुठल्या प्रसंगी प्रबलन देतो कुठल्या प्रसंगी शिक्षा देतो या बद्दल प्रत्येक आई वडिलांनी जागृत असायला हवे.
         या सर्व घटनेवरुन तर गलितगात्र झाल्यासारखे वाटत होते. महाराज होते म्हणून आज आपण आहोत, किमान ही तरी जाणीव त्या मुलाला असायला हवी होती. त्यात त्याची चुकी तीळमात्र नाही, पण आपन एक आई वडील म्हणून कुठे कमी पडतो? याचा विचार प्रत्येक आई-वडिलांनी करायला हवा. ज्याने स्वराज्य घडवले त्याला विसरून आपण भलतेच मार्गदर्शन करून स्वतःला जर आई बाप म्हनत असु, तर ते कुठेतरी चुकीचे आहे. सहज मनात एक विचार येतो, महाराज आम्ही कमी पडतो आहोत आमच्या लेकरांना घडवन्यात! शिवाजी महाराज जन्माला न येण्याचे कारण हेच असावे. कारण शिवाजी महाराज जन्माला घालण्यासाठी जिजामाई मात्र कुठेच दिसत नाही.
        

                               - ग. सु. डोंगरे
        

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!