Posts

Showing posts from 2018

मायेची ओढ....!

चार महिन्यानंतर जेव्हा बाहेर राहणारं पोर घरी जातं तेव्हा त्याचा आनंद काय असेल? हा आनंद अनुभवायला खूप काही सोसावे लागले, ते मेस चे जेवण, रोज रोज प्रवास करून कामाच्या ठिकाणी जाणं, रूम वर राहणं, सगळं काही वेळेवरच, पाहिजे तेव्हा काहीच नाही, अगदी बाहेरचं आयुष्य...!         नाशिक मधे उच्च पदवी चे शिक्षण घेऊन मुंबई सारख्या नगरी मधे समोरचं काही आयुष्य घालवण्यासाठी गेलो, तशी मुंबई म्हणजे माझ्या मनात काय, हे माझ्या 'मुंबई एक न पाहिलेलं स्वप्न' या लेखा मध्ये मी निरागसपणे मांडलेलं आहे..!     असो....            मुंबई म्हणजे माझ्या मनात एक वेगळाच तरंग होता, पण जेव्हा इथे आलो, आता मुंबईचं प्रत्यक्ष जीवन जगतोय, तेव्हा कुठे कळतं आहे की मुंबई खरी काय आहे! धकाधकीचे जीवन, रोज उठून नुसतं पळायचं, ट्रेन च्या वेळेवर आणि तालावर नाचायचं, बस्स रोजची ट्रेन पकडायची, त्याच वेळेची तीच ट्रेन, त्याच ट्रेन चा तोच डब्बा, त्याच डब्ब्यातली तीच सीट, एवढंच आयुष्य! दीड दोन तासाचा प्रवास पूर्ण करून कामाच्या ठिकाणी उतरायचं, उतरताना आणि चढताना मात्र रणांगणातील युद्धाचा प्रसंग असतो, सुखरूप चढलो किंवा उतरलो म्हणजे य

मुंबई एक न पाहिलेलं स्वप्न.....!

GAVRAN SMART BOY IN THE MUMBAI....! लहानपणी tv मध्ये सतत पाहिलेलं एक शहर, खूप काही भावना, स्वप्न आणि भविष्य होत ह्या शहराबद्दल माझ्या मनात, किती सुंदर असेल ना! हिरो, हिरोईन पण किती जवळून पाहायला भेटतील ना! भारी भारी गाड्या, गगनचुंबी इमारती, वाव कित्ती मज्जा येईल ना तिथे जायला!!!!!!!         दर शनिवार - रविवारी दूरदर्शन वर लागणाऱ्या चित्रपटात पाहून या सर्व भावना मनात गोंधळ घालायच्या! मग काय मनातल्या मनातच अक्खी मुंबई फिरून यायचो मी. माहिती नव्हतं कधी जाण्याचा योग ये ईल का नाही ते सुद्धा, आणि कदाचित परिस्तिथीमुळे कधी मुंबई ला जाण्याचं स्वप्न हि पडलं नसावं किंवा बघितलं नसावं. करण मुंबई म्हंटल तर पैसा जवळ असावा लागतो आणि पैसा म्हंटल तर तो आपल्याकडे कुठंय?????           असा प्रश्न पडून मुंबई ला जायचं या स्वप्नाने कधी डोकच वर केलं नाही. पण असेच tv मध्ये मुंबई बघता बघता प्रत्यक्षात मुंबई बघण्याचा एकदा योग आला, तेव्हा मी आठवीच्या सेमी मध्ये शिकत होतो. ऐन घटक चाचणी च्या दरम्यान हा योग आलेला! म्हणून कस करावं हा मोठा प्रश्न पडला. अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असल्या कारणाने शाळा फक्त एक formality  ह

ओवी गं.....!

(सदरील कविता माझ्या संपूर्ण क्लासमेंट्स ना समर्पित! हि फक्त विनोद म्हणून बनवलेली एक गोड अशी आठवण आहे, कृपया कोणी मनाला लावून घेऊ नये..!!!) पहिली माझी ओवी ग भोसला मिलिटरी कॉलेज ला,, शिस्त नीट ठुता येत नाहीतर शिपुरडे कशाला....? दुसरी माझी ओवी ग चॉकलेटच्या ग्रुप ला,, एवढे सगळे असताना हो ग्रुप ग्रुप खेळता कशाला...? तिसरी माझी ओवी ग श्रीकांत खुर्द सरांना,,, एवढ्या डंगऱ्या जीवनी ग शिकायचं कशाला...? चौथी माझी ओवी ग चोपडे मॅडम ला,,, एवढ्या सोप्प्या एज्युकेशन मध्ये bp लो-हाय कशाला....??? पाचवी माझी ओवी ग सूर्यवंशी मॅडम ला,,, एवढ्या मोठ्या जीवाला ग मार्कसाठी भांडण कशाला....? सहावी माझी ओवी ग नेहा शर्मा मॅडम ला,,, एवढ्या हुशार जीवाला ओ लपून कॉप्या कशाला....?? सातवी माझी ओवी ग भागवत च्या त्रिज्या ला,,,, कुंटल भर वजनाला ओ एवढी फॅशन कशाला....! आठवी माझी ओवी ग चपटनाक्या बबिता ला,,,, एवढ्या गोऱ्या जीवाला ओ 36 नखरे कशाला.....? नववी माझी ओवी ग गंगूर्डेच्या गायत्री ला,,,, ढंमक ढोल जीवाला ओ इकडं तिकडं कशाला....? दहावी माझी ओवी ग सिंसीयर भूषण ला,,,,, इकडं तिकडं बघून स

माय माझी.....!

माय माऊलीया माझी...! माय माउलीया माझी, करी उन्हात ती कामं,,, होती जीवाची काहिली, न थांबे थांबता घामं....! उन्हा तान्हाचा तो डाव, चाले दिवसें दिवस,,, हात पाय ते दुखती, ना फिटे तरी कामाची हवस..! पडुन गारांचा तो सडा, होती धान्य ते आडवी,,, गोड धान्य ती सगळी आता लागते कडवी....! माय माझी रं गडयांनो नेसी फाटक लुगडं,,, मात्र मला ती नविणं बघा घालिती कापडं..! प्रेम माझ्या बी मायेचं, आहे बघा लै अफाटं,, जशी उन्हातुन छाया देई का ड्याची कुपाटं...!                          -- ग.सु. डोंगरे                         (८६०५५२२२८५)

होणारी माझी...!

माझ्यासाठी बघणार असाल एखादी तर...! तिने बनवलेल्या जेवन कोणतेही असले तरी, त्यात चव असावी,,,,, आणि ती कशीही असली तरी, तिच्या मनात माझ्या बद्दल प्रेम असावं....! बस! बाकी मी बघून घेईल...!           -- ग. सु. डोंगरे

गोवा एक अविस्मरणीय क्षण...!

सफर गोव्याची...! गोवा,, म्हणजे जन्नत, कॅसिनो, पार्टी, मज्जा, बीच अशा संकल्पना असलेलं मनातलं एक शहर, योगा योगाने योग आला, आणि गणेश आपला गोव्याला निघाला.! सोबत आत्याची फॅमिली माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर लटांबळ,, 18 जानेवारी 2018 ची हि कथा, अर्थात तिला व्यथा म्हणलं तरी हरकत नाही, त्याच कारण कळेलच तुम्हाला! 18 जानेवारी म्हणजे माझ्या जन्मदिवसाच्या अगदी जवळचा, म्हणजे दोन दिवस आधीचा दिवस..! खरंतर जायची इच्छा काही होत नव्हती, कारण दोन दिवसावर जन्मदिवस आला होता, कॉलेज च्या सर्व फ्रेंड्स ना सोडून तिकडे जावसं हि वाटत नव्हतं, पण मनाची दुसरी बाजू भोकली, चल ना भो, गोवा आहे, तिकडे जन्मदिवस, म्हणजे मज्जाच मज्जा, एक मन नको तर एक मन हो,, हा मनाचा खेळ सतत सुरु असतो, म्हणून असा निर्णय घेतला की गोवा ला कढीपन जाऊ, इथले मित्र परत कधी भेटतील का, म्हणून इथं यांच्या सोबत जन्मदिवस साजरा करू! ठरलं पण कॉलेज वरून घरी गेलो आणि कानावर अत्त्याचे शब्द पडले, बॅग भरून ठेव बरका, परवा पहाटे 5 ला ट्रेन आहे.      मग म्हंटल मला तर नाही यायचं ना, तर असं ऐकलं कि तुझं पण रिझर्वेशन केलंय, डोक्यात नुसती कालवा कालव होत ह