गोवा एक अविस्मरणीय क्षण...!

सफर गोव्याची...!

गोवा,,
म्हणजे जन्नत, कॅसिनो, पार्टी, मज्जा, बीच अशा संकल्पना असलेलं मनातलं एक शहर,

योगा योगाने योग आला, आणि गणेश आपला गोव्याला निघाला.!

सोबत आत्याची फॅमिली माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर लटांबळ,,
18 जानेवारी 2018 ची हि कथा, अर्थात तिला व्यथा म्हणलं तरी हरकत नाही, त्याच कारण कळेलच तुम्हाला!

18 जानेवारी म्हणजे माझ्या जन्मदिवसाच्या अगदी जवळचा, म्हणजे दोन दिवस आधीचा दिवस..!
खरंतर जायची इच्छा काही होत नव्हती, कारण दोन दिवसावर जन्मदिवस आला होता, कॉलेज च्या सर्व फ्रेंड्स ना सोडून तिकडे जावसं हि वाटत नव्हतं, पण मनाची दुसरी बाजू भोकली, चल ना भो, गोवा आहे, तिकडे जन्मदिवस, म्हणजे मज्जाच मज्जा, एक मन नको तर एक मन हो,,
हा मनाचा खेळ सतत सुरु असतो, म्हणून असा निर्णय घेतला की गोवा ला कढीपन जाऊ, इथले मित्र परत कधी भेटतील का, म्हणून इथं यांच्या सोबत जन्मदिवस साजरा करू! ठरलं पण कॉलेज वरून घरी गेलो आणि कानावर अत्त्याचे शब्द पडले, बॅग भरून ठेव बरका, परवा पहाटे 5 ला ट्रेन आहे.
     मग म्हंटल मला तर नाही यायचं ना, तर असं ऐकलं कि तुझं पण रिझर्वेशन केलंय, डोक्यात नुसती कालवा कालव होत होती,  कारण एकीकडे माझे मित्र जी कि माझ्या जन्मदिवसाची वाट बघत होते, कि सोबत साजरी करू, खूप मज्जा करू, त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे असा योग कि माझ्या जन्मदिवसाच्या दिवशीच म्हणजे 20 जानेवारीला कॉलेज चा सांस्कृतिक कार्यक्रम हि होता, म्हणजे जस काही माझं लग्न, आणि सगळे नटून थटून आलेले विद्यार्थी माझे वऱ्हाडी असच काहीतरी!!

असो....
सगळ्यांपर्यंत बातमी पोहोचली कि G.D. गोवा ला जातोय, आणि ते हि डेज च्या म्हणजे सांस्कृतिक च्या दिवशी, आणि जन्मदिवस पण आपल्या सोबत नाही,, बस रे बस सगळी मित्रकंपनी असं बघत होती की मी खून केला एखाद्याचा! बोलायला तर एक जण तयार नव्हतं, कस बस सगळ्यांना समजावलं, आणि इकडे निघायला तयार झालो,

त्याच बरोबर उत्सुकता पण होती की गोवा ला जाणार तिथे मज्जा करणार, कस असेल गोवा असे गोंधळ माझ्या मनोमनीच चालू होते, आणि ते मी रंगवत निघालो.

आता गोव्या ला जायचा योग आला कसा?
गोव्याला माझ्या अत्त्याचे दीर राहतात, त्यांचा खूप मोठा माश्यांचा व्यापार आहे तिथे, खूप पैसा हि आहे त्यांच्याकडे..! अर्थात या शेवटच्या वाक्याचा अर्थ मला अजूनही कळाला नाही, सगळे असं म्हणतात म्हणून मी पण म्हंटलो! हं तर त्याच काकांच्या मुलीचा जन्मदिवस होता, तो म्हणजे माझ्याच दिवशी! मग तर मी आणखीच खुश झालो. घरचे सगळे त्या निमित्ताने तिकडे निघाले होते, मी मात्र गोवा बघायला आणि फिरायला निघालो होतो!

असो 18 ची पहाट अर्थात ती रात्र असावी, 3 ला उठले सर्व, अंघोळ करून आवरलं, सोडायला अत्त्याचा जावई येणार होता..! त्यांना फोन केला, आवरलं सगळ्यांचं या, पहाटेचे चार वाजले होते, त्यांचे शब्द आले की ट्रेन लेट आहे, झोपा परत जायच्या वेळेला येतो म्हणे मी..!! मग ऑनलाइन पाहिलं ट्रेन च स्टेटस तर कळालं कि खरच ट्रेन 3 तासाने उशिरा आहे! मी तर म्हणलं चला झोपा आता, दाजी आल्यावर उठू, तर झोपून गेलो मी, 6 ला दाजी आले, म्हणे आवरा मग स्टेशन वर जाऊ, उठलो परत मग आणि गेलो स्टेशन ला 7 वाजता, ट्रेन येण्याचा वेळ 8 चा होता म्हणून!
    आलो स्टेशन वर, बसलो ट्रेन ची वाट बघत बघत, ट्रेन ची न आमची जशी खूप जानी दुश्मनी होती, ती लेट लेट होतच गेली 7 वाजल्यापासून ते 11 पर्यंत वाट पाहत बसलो, 4 तसाचं वाट पाहण्याचं सत्र सुरू राहील, अखेर ट्रेन अली, त्यात अशी गंमत कि तीन वेगवेगळ्या डब्ब्यात आम्हा 5 जणांची वेग वेगळी जागा! याला म्हणतात दुष्काळात 13वा, काय मग सगळे शिरलो ट्रेन मध्ये शीट शोधले आणि बसले,
अडजस्टमेंट करून आम्ही सर्व जण एका डब्ब्यात एकाच जागेवर आलो! एक एक स्टेशन जात होतं, ट्रेन तसा तसा उशिराने जात होती, संध्याकाळी 7 ला पोहोचणारी ट्रेन पहाटे 4 वाजता ठिविम ला पोहोचली, अशी ती ट्रेन एकंदरीत 9 तास उशिराने होती,

असो ठिविम जवळ आलं, सगळ्या बॅग समोर काढून ठेवल्या, आणि माझी पाठीवरची बॅग माझ्या सीट वरच होती, S5 seat no.48 असे माझे वरचे सीट होते, अत्त्याचा सगळ्या बॅग व्यवस्तीत घेण्याच्या नादात नेमकी माझी बॅग ट्रेन मधेच राहून गेली, गंम्मत अशी की सगळ्या बॅग घेऊन बाहेर पडलो, घ्यायला गाडी येणार होती, तिची 10 मिनिटं वाट पाहिली, मग गाडी खाली म्हणून बॅगा घेऊन गाडीकडे निघालो, तेवढ्यात माघून आवाज आला की जणू तुझ्या पाठीवरची बॅग कुठय??,,
     बस्स्स मेंधु हँग पडला, तोंड सुन्न पडलं, पळ लवकर बघ वरती थांबलो होतो तिथे आहे का ती, पळत गेलो, तसेच आठवत हि होतो, कि कस कस काय केलं, त्यावरून लक्षात आलं, कि आपली बॅग ट्रेन मधेच राहिली, धन्यरे भाऊ, असं म्हणत मी बॅग गेली असं मनाला रडून सांगत होतो, पण तितक्यात आवाज आला की स्टेशनमास्टर ला सांग, तो पुढच्या स्टेशन वर कॉल करून सांगेल मग धावत गेलो, तिथे स्टेशन मास्टर बसलेला होता,
अंदर आ सकता हूं क्या सर,
तो म्हणे आ जाओ,
म्हंटल सर माझी बॅग आत्ताच्या ट्रेन मध्ये विसरून राहिली तर कृपया समोरच्या स्टेशन ला कॉल करून तुम्ही सांगा ना ती बॅग घेऊन ठेवायची, तर त्याने थोडे बोलणे सुनावले, आता गरज माझी होती, आणि चुकी हि माझी होती म्हनून दातांची बुक्की करून मी ते गप्प बसून ऐकून घेतले, आणि त्यांना म्हंटल कि त्यात माझे डॉक्युमेंट्स आणि कॅश आहे, त्यांनी कॉल केला, सीट no ते सर्व काही सांगितलं, आणि फोन ठेवला, व मला म्हणेल ट्रेन वहा जाणे के लिये एक घंटा बाकी है, तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा, बॅग जर त्या सीटवर मिळाली तर ते घेतील आणि मला फोन करतील मग मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही त्या स्टेशन ला जाऊन ती घेऊन येऊ शकता,
त्यांना धन्यवाद बोललो, बाहेर आलो तसे ते काका हि आले होते घ्यायला, त्यांना हि वाट पाहावी लागत होती, म्हणून 15 मिनिटाने परत त्या मास्टर कडे गेलो, आणि त्यांना विनंती केली की आमचा no. देतो ती बॅग मिळाल्यावर कॉल करा, तोपर्यंत अंगी त्या गावाकडे म्हणजे स्टेशन कडे निघतो, तो बिचारा चांगला होता, त्याने no. घेतले आणि फोन करतो असे बोलला, मग तिथुन निघालो. काकांनी पणजी च्या बस स्टॉप वर आम्हाला सोडले, 4.30 ला पोचलो तर 5 नंतर मडगाव स्टेशन साठी गाड्या मिळतील असं कानावर पडलं, बसलो वाट पाहत, अर्ध्या तासाने स्टेशन मास्टर चा फोन आला, बॅग मिल गाई, 9 बीजे जाकर RPF पोस्ट मेसे बॅग लेलो अपनी, हे ऐकल्या नंतर त्याचे आभार कसे मानावे कळत नव्हतं, त्याला म्हंटल थँक यु सो मच सर, आणि उत्सुकतेने गाडीची वाट पाहत बसलो, 5.30 ला बस अली, जिघालो मडगाव ला, एका तासात मडगाव आलं, पण गाडी स्टेशन वर जात नाही, असं ऐकून स्टेशन कॉर्नर वर उतरलो आणि तिथून 3km पाई गेलो, स्वतःला च दोष देत, टोमणे मारत पाऊल टाकत होत, म्हंटल गोवा चांगलच भावलं आपल्याला, पन मनाची दुसरी बाजू, जाऊदे अनुभव तर आला ना, आता परत असं होणार नाही हे मात्र नक्की, तर असे कर्माला दोष देत देत RPF पोस्ट पर्यंत पोहोचलो, तिथे गेल्यावर नजरेसमोर जेव्हा बॅग आली तेव्हा असं वाटलं की एखादं गोल्ड मेडल मिळवलं, तर तिथल्या ऑफिसर ने विचारपूस केली, काय आहे काय नाही बॅग मध्ये याची, बॅग याचीच आहे ना, अशी पक्की खात्री करून घेतली, आणि ते महाशय उद्गारले कि 10 वाजता ये आणि बॅग घेऊन जा, आमचे काही रुल्स असतात त्या नुसारच आम्ही तुझी बॅग देऊ, तर 10 वाजता सर येतील तेव्हा देऊ, असं ऐकून तिथून बाहेर आलो, सोबत अत्त्याचा मुलगा हि होता, त्या बिचार्याची माझ्या सोबत हांजी हांजी, अन पाय पुंजी झाली होती, बाहेर आल्यानंतर नास्ता केला, बसलो त्या पोस्ट बाहेरच वाट पाहत, सकाळचे 7 वाजले होते, घर सोडून अक्खे 24 तास पूर्ण झाले होते, तर 9 वाजता त्या ऑफिरने आवाज दिला, एक अर्ज लिहून घेतला , सोबत बॅग चेक केली, बॅग देताना फोटो काढून घेतला, त्यांच्या ज्या काही प्रोसेस होत्या त्या सगळ्या संपवल्या, नंतर त्यांचे हि आभार व्यक्त केले,
आणि निघालो काकांच्या घराकडे! घर कसे असेल, काय काय असेल तिथे असे विचारचक्र डोक्यात सुरूच होते, तासाभरात घरी पोहोचलो होतो, पूर्ण थकून हि गेलो होतो, फ्लॅट मध्ये गेलो तर बघतच राहिलो, इतकं मस्त घर, कि माझे स्वप्नातले घर हि फिके पडेल असे, जवळपास 90 लाख, त्यापेक्षा जास्त हि असू शकतात असा तो 3 bhk चा फ्लॅट होता, गेलो बाथरुम मध्ये तिथे वेस्टर्न टॉयलेट बघून जरा तारंबळच झाली..!
   आवरलं बाहेर आलो, त्यांची बायको पहिल्याच वेळेस बघितली होती मी, ती चायनीज होती तिला मराठी, हिंदी या दोन्ही हि भाषा येत नव्हत्या, इंग्लिश हि जास्त जमत नसे, ती काकांशी हि चायनीज मधेच बोलायची! पहिल्या दिवशी तर 4 पर्यंत आरंच केला नंतर बीच वर गेलो, तिथला सनसेट मस्त होता, तिथे थोडा प्रसन्न झालो, नंतर फिरत फिरत घरी गेलो, ती रात्र 19 ची होती.! सगळे मला शुभेच्छा देण्यासाठी 12 विजेची वाट पाहत होते, आणि मला मात्र खूप झोप येत होती, मला तर लक्षात हि नाही की 12 नंतर आपला जन्मदिवस सुरु होईल.
    12 पर्यंत मला जगं ठेवण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, नंतर ak47 बंदुकीची फायरिंग झाल्यासारख्या शुभेच्छा येऊन धड धड आदळत होत्या..!
बस रे बस जस्काय एखादा स्टार तर नाही झालो ना मी असा भास होत होता,, त्याच बरोबर आयुष्यात किती माणसे जोडले आपण याची जाणीव हि झाली..!

ती रात्र अविस्मरणीय होती, कारण AC वाली रूम, त्यात मस्त बेड, वरती POP, गादी एकदम मऊ, आणि शुभेच्छांचा होणारा सुगंधित सडा! अशी ती रात्र गेली, सकाळ उजेडली काकांच्या मुलींचा जन्मदिवस म्हणून सगळे उत्साहात होते, माझा फक्त माझ्यासाठी, आणि माझ्या सगळ्यासाठीच होता, मी हि कोणालाच बोललो नाही की माझा हि आज जन्मदिवस आहे, आत्यांना माहिती होत, पण काकांना स्वतःहून कस म्हणावं म्हणून कोणीच काही बोललं नाही..!
सगळ्यांचं आवरलं, सगळे मिळून म्हापसा च्या गणपती मंदिरात गेलो, तिथे दर्शन घेऊन तिथेच एक आनंद निकेतन म्हणून स्लो लर्नर मुलांची शाळा होती तिथेच दर वर्षी काकांच्या मुलीचा जन्मदिवस साजरा केला जात असतो, त्या दिवशी माझा हि तिच्याबरोबर तिथेच झाला, खरतर तिथले सगळे विद्यार्थी आमचे होते, कारण आम्ही मानसशास्रज्ञ ना, तिथे त्या मुलांनी झिंगाट गाण्यावर डांस केला, सगळं आवरलं, मग तिथेच त्यांच्यासोबत जेवण केलं, आणि तिथून घरी आलो, आता अराम करा, संध्याकाळी मोट्टी पार्टी अरेंज केलेली होती, मग संध्याकाळची वाट पाहत निपचित बेड वर पडून होतो, शुभेच्छांचा वर्षाव मात्र सुरूच होता..! 6 वाजले सगळे रेडी झाले, हॉटेल कडे निघालो, हॉटेल वर पोहोचलो तर काय तो नजारा, समुद्र किनाऱ्यावर ती हॉटेल, मोठमोठाल्या जहाजामधले कॅसिनो, बघून असं मधुन गुदगुल्या व्हायच्या, नंतर योगायोग एका फ्रेंड चा कॉल आला आणि तिने हि शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्या काकांची बायको बाजूलाच होती, देव जाणे तिला कस कळालं, तिने मला विचारलं तुझा जन्मदिवस कधी असतो, मग मी म्हंटल आजच माझाही आहे, त्या शॉक झाल्या, नंतर मी तिथून बाजूला निघून गेलो फोनवर बोलत बोलत, नंतर त्यांनी ते काकांना सांगितलं तर त्यांनी बोलवलं मला शुभेच्छा दिल्या आणि काही शब्द उद्गारले, कि ते ऐकून असं वाटत होत की उगाच त्यांना सांगितलं आजच माझा जन्मदिवस आहे म्हणून..!

असो थोडा उपसेट झालो पण दर वेळेस सारखं मनाला समजावत पार्टी एन्जॉय केली, अशी की जशी ती माझ्याच जन्मदिवसाची पार्टी आहे..! NOT MY BUT MY असं टाकून फोटो अपलोड हि केले...! मज्जा आली , खूप मस्त जन्मदिवस साजरा केला गेला काकांच्या मुलीचा, मी मात्र नुसता आश्चर्य चकित होऊन बघत होतो, मला तिळमात्र हि वाटलं नाही की आज माझा सुद्धा जन्मदिवस आहे, तो मी फक्त तिचा म्हणूनच एन्जॉय केला..!
12 वाजले सगळं अवरल्या नंतर घरी गेलो, झोपलो, सगळ्या मित्रांचे घरच्यांचे आभार मानले, कारण तेच होते कि ज्यांच्यामुळे मला क्षणाक्षणाला आज माझा जन्मदिवस आहे याची जाणीव होत होती, रात्र होऊन गेली तर मात्र शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता, खंत मात्र एक वाटत होती की याना सगळ्यांना सोडून मी असा एकटाच का बरं जन्मदिवस साजरा करायला आलो असेल!!
असो ती रात्र गेली, 21 ची सकाळ अली उठलो आवरलं, नेट सुरु केलं तर चक्क तेव्हाही तेच, बी लेटेड म्हणून शुभेच्छा येत होत्या, खरच आयुष्यात खऱ्या आर्थने आपल्या अस्तित्वाला महत्व तेव्हा मिळालं, तुम्हीच सर्व माझे असं बोलून दिवसाची सुरुवात केली, त्या दिवशी खरेदीसाठी मॉल मध्ये आम्हाला सोडलं, तिथे काकांची बायको हि आमच्या सोबत होती, तर त्यांनी मला परफ्युम आणि जॅकेट गिफ्ट केलं, त्यांचा स्वभाव खरच खुप छान होता, जरी त्यांना आपली भाषा वगैरे येत नव्हतं तरी त्या खूप मिळून घेण्याचा प्रयत्न करायच्या!
खरेदी झाली घरी आलो, 4 वाजता पावला पोंडा च्या बीच वर गेलो, जिथे सिंघम चा एक शॉट शूट केला होता, थोडे फोटो काढले परत घरी गेलो 21 चा दिवस गेला, 22 चा दिवस उजेडला, त्या दिवशी परत एका मार्केट ला गेलो, तिथे थोडी खरेदी केली, घरी आलो, नंतर 4 वाजता काजू खरेदीला गेलो, घरच्यांसाठी मी काहीच घेतलेलं नव्हतं, मग त्यांच्यासाठी थोडी खरेदी..!
असं करून घरी आलो, पहाटे 3 ची ट्रेन होती म्हणून लवकर झोपायचं होतं, झोप काही येत नव्हती, झोपलो 2 ला उठलो आवरलं, काकांनी स्टेशन वर सोडलं, 4 ला ट्रेन अली त्यात बसलो, आणि नासिक कडे रवाना झालो, गोवा दर्शनामध्ये खूप मस्त अनुभव, त्याच बरोबर मज्जा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंती अनुभवायला मिळाली...!

अशी एकंदरीत माझी चार दिवसाची गोआ रिटर्न ट्रिप झाली..!
धन्य जाहलो...!!!

             -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!