Happy संक्रांत....!

संक्रांति चा काळ तो मंगल,
पतंग उडवूनि करू ती दंगल..!

गुळाचा गोडवा, तिळाच्या लाडवा,,
ओठात ठेवुनी, मनास भिडवा...!

मनातले विचार, समाजातले आचार,,,
सुधारून त्यांना, देऊ सुविचार...!

गोड गोड बोलणे तर सुरूच ठेवावे,
पण नेहमी ते स्वार्थाशिवाय असावे..!

जीवन आपले होऊनि गुळासारखे,
मोत्यांनी सजवू त्याला तिळासारखे....!

संक्रांतीच्या शुभेच्या गोड गोड,,,
आपल्या सर्व वाईट गोष्टींची व्हावी मोडतोड..!!

शुभेच्या घ्या आणि गोड गोड बोला,,

               -- ग. सु. डोंगरे

(गोड गोड बोला, गोड बोलून फसवू नका....!)

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!