आई चे अश्रु....!

        (मुंबई मधे एक वर्ष काम करून परत घरी जाऊन मुंबई ला परत येण्याचा योग)  
        मुंबई सोडल्यानंतर जवळपास नऊ महीने घरिच होतो, त्यात नेट चा अभ्यास तर एम फिल च्या प्रवेश परिक्षाची तयारी, तीन ठिकाणी परीक्षा देऊन ही प्रवेश मिळाला नाही, काही ठिकाणी मी कमी पडलो, काही ठिकाणी पैसा कमी पडला तर काही ठिकाणी मी ओपन कैटेगरी चा आहे म्हणून नंबर नाही लागला. पण तीन वर्षानंतर घरी आलो होतो, म्हणून जरा बरं वाटत होतं.
        नेट परीक्षा झाली, त्यात पास नाही झालो मग कुठून तरी अशी जाणीव होऊ लागली की घरी राहून अभ्यास नाही होत, कुठेतरी बाहेर रूम करून राहून अभ्यास करू, त्याच बरोबर पैसे कमवायच्या वयात घरी बिनाकामाचे बसून राहणे मला ही जडच जात होते, अभ्यास करतो म्हणावे तर त्या मानाने अभ्यास ही नव्हता होत. मग शेवटी बाहेर राहून काहीतरी नोकरी करुन अभ्यासही करावा असा विचार केला आणि मुंबई ला परत जायचे ठरवले! पण एकीकडे मनात असे ही विचार होते की मुंबई सोडून खुप काही गावासाठी, आई वडिलांसाठी आणि मानसिक अजारांसाठी स्वप्ने घेऊन आलो पण त्यातले एकही पूर्ण झाले नाही किंवा होऊ शकले नाही. म्हणून मुंबई पेक्षा दुसरीकडे कुठे तरी जावे असा विचार होता.
        त्या दिवसात पुण्या ला एका कार्यशाळेच्या निमित्ताने गेलो, तिथुन मुंबई ला जाऊन येऊ असा विचार केला आणि दिनांक १४-०२-२०२० रोजी मुंबई ला पोचलो, दूसऱ्याच दिवशी मला माझ्या मुलांना म्हणजे ज्यांचे मी सेशन घ्यायचो (उर्मी फाउंडेशन) त्यांना भेटायला जायचे होते, कारण तिथे जाऊनच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव होणार होती, तिथे गेल्या नंतर सर्व मुले मला बघून खुप खुश झाली, मला ही त्यांना पाहुन कुठली तरी लढाई जिंकल्यासारखा आनंद झाला. त्या दिवसात खुप मज्जा केली, दुसऱ्या दिवशी मुंबई मधल्या काही मित्रांना भेटून नाशिक साठी निघनार होतो. पण तेवढ्यात एक जॉब नोटिफिकेशन मिळाली २०-०२-२०२० या रोजी त्यांच्याकडे इन्टरव्हिव होता, मग तिथल्या एका हितचिंतकाचे म्हणणे असे की इन्टरव्हिव देउनच जा, मी पण विचार केला की देउनच जाऊ, झाले सिलेक्शन तर छानच. म्हणून थंबलो तिथेच, डोक्यात विचार आला की आपण होम सेशन पण घेऊ शकतो, मग त्याची प्लानिंग केली, आणि ठरवले की मुंबईलाच परत यायचे, होम सेशन घेऊन पैसा कमवायचा आणि अभ्यास करायचा. अखेर २० तारखेचा तो दिवस आला, सर्व अवरुन इन्टरव्हिव द्यायला गेलो, तिथे जास्त गर्दी नव्हती, नाव नोंदणी केली तेव्हा माझा अकरावा नंबर होता, इन्टरव्हिव मधे जास्त काही न विचारता तिथुन मला जाऊ शकता, तुमचे सलेक्शन झाले तर तुम्हाला मेल येईल असे बोलण्यात आले, त्यावरून एकंदरीत असे लक्षात आले की यांना कोन घ्यायचे आहे हे त्यांनी ठरवलेले आहे, इन्टरव्हिव फक्त फॉर्मेलिटी म्हणून घेतला जातो आहे. तो झाल्यानंतर नाशिक ला निघण्याच्या तयारित होतो, कारण एकदा घरी येऊन परत एक मार्च पासून मुंबई ला राहायला जन्याच्या विचारने! पण तिथुन रूम वर पोहोचतो की मला एक कॉल आला, "हैल्लो मैं डॉ. शेख बात कर रहा हूँ, क्या आप गणेश डोंगरे बात कर रहे हों?" मी बोललो "हा बोलिये" त्यांनी विचारले "क्या आपने राजावाड़ी हॉस्पिटल की साइकोलोजिस्ट के पोस्ट के लिए अप्लाई किया था?" मी थोड़ आठवून बोललो "हा किया था" त्यावर ते बोलले "क्या आप यहा जॉब करने के लिए डेडिकेटेड हों?" मी आनंदाने बोललो "हा सर बिलकुल" मग ते बोलले की "तो फिर आप कल सुबह दस बजे मैडम आने वाली है, तो इन्टरव्हिव के लिए आ जाओं" मी बोललो "ठीक है, मैं आ जाऊंगा", आणि अगदी एखादी लॉटरी लगल्यासरख्या आनंदात फोन कट केला. कारन राजावाड़ी हॉस्पिटल हे BMC हॉस्पिटल, त्यमधे मी साइकोलोजिस्ट म्हणून काम करणार, हा आनंद खुप काही देऊन गेला. दुसऱ्या दिवशी २१-०२-२०२० महाशिवरात्रिचा दिवस, त्या दिवसात माझी आई मला प्रत्येक महाशिवरात्रिला उपवास धरायला लावते, मग मी उपवास ठेवावयचा ठरवले, आणि सकाळी चाहा पिउन शेजारिच एक महादेवाचे मंदिर होते तिथे दर्शनाला गेलो, प्रसाद घेतला आणि इन्टरव्हिव साठी गेलो. तिथे गेल्यानंतर काळाले की मॅडम आणखी आलेल्या नाही, थोड्या वेळात येतील तोपर्यंत बाहेर बसा. थोड्याच वेळात मॅडम आल्या, त्यांचे नाव डॉ. पारुल टंक (मानसोपचारिका) ह्या तिथल्या डिपार्टमेंट च्या मुख्य आहेत. नंतर आतमधे गेलो तेव्हा काळाले की तिथे माझ्या व्यतिरिक्त आनखीही काही जनें इन्टरव्हिव ला आलेले, थोड्याच वेळात एक एकाचे असे इटरव्हिव झाले, आणि माझा नंबर आला, आतमधे जाताना धकधक होत होती, जशी प्रत्येकाची होते. कारण मला ही तिथे मी सेलेक्ट व्हावे अशी तीव्र इच्छा होती. इन्टरव्हिव मधे खुप काही विचारले गेले, त्या अनुभवावरुन एकंदरीत मला अस वाटले की मॅडम माझ्या उत्तरांवर खुश होत्या!त्यांणी ही इव्हीनिंग ला कळवतो असे बोलून मला जायचे सांगितले. तिथुन घरी आलो, भूक लागली होती, उपवास आहे, उपवासाचे काही खायला मिळत नव्हते, म्हणून शेजरच्या पोळीभाजी सेंटर ला गेलो, आणि उपवास सोडायचा ठरवले, आणि तिथे पोळी भाजी ऑर्डर खेली, पन म्हंटल विचारुन पहाव, म्हणून सहज विचारले की "तुमच्याकडे उपवासाचे काही आहे का?" तर समोरून उत्तर आले "हो भगर आहे". मी खुश झालो, म्हंटल चला आजचा उपवास घडला, आणि भगर केळी घेऊन खाल्ली. पुण्याचा एक मित्र येणार होता म्हणून त्या दिवशीही तिथेच थांबलो. कधी इव्हीनिंग होईल याची वाट बघत होतो. पुण्याचा मित्र आला, गप्पा मारत बसलो, शेवटी साहा वाजुन चार मिनिटांनी मला मॅडम चा कॉल आला, आणि त्या बोलेल्या "हैल्लो गणेश, आपका राजावाड़ी हॉस्पिटल में सिलेक्शन हुआ है, तो आप जितना जल्द हो सके उतने जल्दी जॉइन कर लो, ये आपके और हमारे लिए अच्छा रहेगा" हे ऐकून मी खुप जास्त खुश झालो होतो, मी बोललो "हा मैंम मैं २७-०२-२०२० को कर लूंगा"!.
        हे सगळे कसे झाले काहीच कळाले नाही. BMC हॉस्पिटल मुंबई मधे माझे सिलेक्शन! महाशिवरात्रिचा दिवस! माझा उपवास घड़ने! खर तर मी तिथे आप्लिकेशन करून एक महीना पूर्ण झाला होता आणि काही रिप्लाय नाही आला म्हणून परत चौकशी केली तर जॉइनिंग झाली कोणाची तरी असे समजले. तिथे फक्त दोन दिवस थांबेल असे म्हणून आठ दिवस राहिलो, त्या नंतर त्यांचा स्वतः हुन कॉल येनं कसा सगळा योगा योग! या सर्वामधून कुठेतरी या गोष्टीची जाणीव होते आहे की देवाला नेहमी आपली काळजी आहे आणि तो अगदी आपल्याला हवे तसे सर्व घडवतो, फक्त त्याच्या परिक्षेमधे पास होने आणि त्याबद्दल आत्मश्रद्धा ठेवणे गरजेचे आहे.
        हे सर्व झाल्या नंतर सर्वात अगोदर घरी फोन केला, आनंदाची बातमी दिली, सगळे खुप खुश झाले, कधी सकाळ होईल आणि मी घराकडे निघेल असे झाले. आयुष्यात पहिल्या वेळेस त्या रात्री काहीतरी चांगले घडल्यामुळे रात्रभर झोप नाही आली, आक्खी रात्र डोळे सकाळ व्हायची वाट बघत होते. शेवटी चार वाजता उठून आंघोळ केली अवरले आणि घराकडे निघालो. अवघे तीनच दिवस घरी राहायला मिळणार होतं, चौथ्या दिवशी तर निघनार, म्हणून निघायच्या तयारित, सामान वगैरे पॅक केले, आईने लाडू चिवड़ा आणखी भरपूर काही खाद्य पदार्थ दिले, मायमाउली माझी ती, तिच्या प्रत्येक खाऊ घेतलेल्या घसामधे हाच आवाज ऐकायला यायचा 'किती खाऊ घालु तुला, तुला तिकडे गेल्यावर चांगले जेवन मिळणार नाही' म्हणून तिची पूर्ण तीन दिवस नुसती उठाठेव सुरु होती, अखेर निघायचा दिवस आला, २६-०२-२०२०  माझी ट्रेन दीड वाजता होती, मला घरातून बारा वजताच निघावे लागणार होते, सकाळीच उठून माझे काही कपड़े धुवायचे राहिले होते ते धुवून वाळायला घातले, म्हणजे मी निघायच्या वेळीपर्यंत ते वाळतील. खायला बनवले, मला सोबत नेन्यासाठी, एक एक गोष्ट काढून देत, तिची त्या मागची भावना मला समजत होती, साडे अकरा वाजले होते, माझ सगळ अवरुन झालं होतं. जेवन करून मी नेहमी प्रमाणे आजी चे आणि आईचे दर्शन घेतले, आई ने जवळ घेतले, चेहऱ्यावरुण हात फिरवला, आणि माझ्या कपळावर एक पापी दिली. खरतर माझ्या संपूर्ण आयुष्यात मला जेव्हा पासून समजते तेव्हापासुनचा हा पहिला असा क्षण असेल. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रु ओघळले आणि तीने मला निरोप दिला.....!
        मी धन्य जहलो, ते अश्रु मी तिचे मन जिंकल्याचे भासत होते, विश्वाला जिंकून घेतल्यासरखे वाटत होते. तो क्षण अगदी सुवर्ण अक्षरांनी माझ्या कळजात कोरला गेला आणि आईच्या प्रेमाची एक वेगळीच जाणीव करवून गेला...!

                  --  ग. सु. डोंगरे

Comments

  1. अप्रतिम ह्लदयस्पर्शी लेखन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

संघर्ष