Posts

Showing posts from 2021

तनाव.........!

तणाव ही गोष्ट आता सामान्य झाल्यासारखी भासते, अगदी लग्ना सारख्या सौख्यभऱ्या प्रसंगात सुद्धा. खरतर हा एक आयुष्यातला आनंदी क्षण असतो, महत्वाचं एक पर्व म्हंटल तरी हरकत नाही. दोन परिवार एकत्र येणार असतात, आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येणार असते, जी की हक्काने 'ही माझी आहे' असे म्हणू शकतो. प्रेम संबंध, नाती यांसारख्या असंख्य गोष्टी नव्याने आयुष्यामध्ये प्रवेश करतात, पण या सर्वांमध्ये तणाव हा ही तितकाच महत्वाचा झालेला दिसून येत आहे.         हे वय म्हणजे प्रचंड संघर्षाने भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण यामध्ये करिअर ची सर्वात मोठी चिंता, त्यात घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, जोडीदाराला खुश ठेवणं, आर्थिक बाबी योग्य पद्धतीने सांभाळणं, सासरकडच्यांच्या अपेक्षांचा मान राखणं, समाजाचा विचार करणं असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असतात. या सर्वांमध्ये स्वतःच एक पर्सनल आयुष्य कुठेतरी दूर कोपऱ्यात कुथत पडलेलं असतं. म्हणून या सर्व बाबी किंवा अपेक्षा पूर्ण करता करता माणूस स्वतःसाठी जगायचं मात्र विसरूनच जातो. त्यामुळे तणावासाठी यापेक्षा आणखी मोठं कोणतं कारण असेल असे मला तरी नाही वाटत.