तनाव.........!

तणाव ही गोष्ट आता सामान्य झाल्यासारखी भासते, अगदी लग्ना सारख्या सौख्यभऱ्या प्रसंगात सुद्धा. खरतर हा एक आयुष्यातला आनंदी क्षण असतो, महत्वाचं एक पर्व म्हंटल तरी हरकत नाही. दोन परिवार एकत्र येणार असतात, आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येणार असते, जी की हक्काने 'ही माझी आहे' असे म्हणू शकतो. प्रेम संबंध, नाती यांसारख्या असंख्य गोष्टी नव्याने आयुष्यामध्ये प्रवेश करतात, पण या सर्वांमध्ये तणाव हा ही तितकाच महत्वाचा झालेला दिसून येत आहे.
        हे वय म्हणजे प्रचंड संघर्षाने भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण यामध्ये करिअर ची सर्वात मोठी चिंता, त्यात घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, जोडीदाराला खुश ठेवणं, आर्थिक बाबी योग्य पद्धतीने सांभाळणं, सासरकडच्यांच्या अपेक्षांचा मान राखणं, समाजाचा विचार करणं असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असतात. या सर्वांमध्ये स्वतःच एक पर्सनल आयुष्य कुठेतरी दूर कोपऱ्यात कुथत पडलेलं असतं. म्हणून या सर्व बाबी किंवा अपेक्षा पूर्ण करता करता माणूस स्वतःसाठी जगायचं मात्र विसरूनच जातो. त्यामुळे तणावासाठी यापेक्षा आणखी मोठं कोणतं कारण असेल असे मला तरी नाही वाटत.
        याच बरोबर यापेक्षा ही मोठं म्हणचे एका पुरुषासाठी आव्हानच असेल, ते म्हणजे आपल्या आईची मनधरणी करणं. कारण समाजामध्ये आज काल हा ट्रेंडच सुरू झालाय की ' घरामधे सून आल्या नंतर पोरगा आईचा राहात नाही'.....! इतकी घाणेरडी गोष्ट आहे ना ही, की यामुळे प्रत्येक आयांच्या डोक्यामध्ये हे सुरवातीलाच फिक्स होऊन जातं आणि नंतर मात्र तो जो कोणी पुरुष असेल त्याला हे लग्नापासून ते मरेपर्यंत सोसावं लागतं.
        खरतर ही इतकी घाणेरडी विचार सारणी आहे की त्याचमुळे विभक्त कुटुंब पद्धती उदयास आलेली आहे. कसं शक्य आहे की पोरगा आयांचा नाही राहात वगैरे???!!!!! आणि या गिष्टीमुळे घरामध्ये संवाद होण्या ऐवजी फक्त वाद होतात. कारण मुलाचा बोलण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असतो आणि आई मात्र ते वेगळ्याच पद्धतीने घेते. आणि ही गोष्ट अगदी चोटछोट्या गोष्टींवर दिसून येतो. म्हणून मग आई आणि बायको या दोन डगरी वर एकदाच मुलगा पाय ठेवायला जातो तर त्याची ......... फाटते. 
        किती दुर्दैवाची बाब आहे ही. किती प्रचंड तणाव असेल तो!
        किती सहज गणित असतं इथे, पण ते आपण अवघड पद्धतीने सोडवायला निघतो आणि ते सुटत नाही म्हणून अक्ख आयुष्य तणावातच निघून जातं. 
        त्यात त्याला बाहेरच्या ही गोष्टी असतातच. नोकरी, आर्थिक बाजूंचा समतोल राखणं, समाजात स्वतःचं एक स्थान मिळवणं, स्वतःच्या स्वतः कडून असलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणं, छंद जोपासणं. पण या सर्वांमध्ये ही एक ही गोष्ट धड होत नाही, आणि शेवटी तणावाचा शिकार तो बनतो. 

            अगदी सरळ सध्या आणि सोप्या पद्धतीने यामधून बाहेर पडू शकतो प्रत्येक जन, फक्त त्यासाठी परिवार तसा हवा, ज्यामध्ये वाद नाही तर संवाद असायला हवा. ज्यामध्ये सौंशयाला कुठलीच जागा नसायला पाहिजे, जमध्ये समजूतदार पणाने प्रत्येक गोष्ट समजून घेणारे व्यक्ती असायला हवेत. मुलाचं लग्न होतंय, तर मुलगा आई चा राहणार नाही, या वीचारापेक्षा मुलाच्या आयुष्यात आता त्याची अर्धांगिनी येणार आहे ही समज असणं खूप गरजेचं आहे.
            त्याची विचारसरणी बदलेल, त्याला त्याच्या बायकोचा, भविष्याचा, तसेच त्याचा स्वतः चा देखील विचार करणं भाग आहे. ही समज असणं अत्यंत गरजेचं आहे.
            दोन परिवार एकत्र येणार आहेत तर त्यांच्याशी प्रेमसंबंध स्थापित व्हायला हवेत. लग्न सोहळा आनंदी पार पडायला हवा. जर या सगळ्या गोष्टी असतील, किंवा मुळात आपला परिवार आपल्याला समजून घेत असेल तर मला नाही वाटत कुठे तणावाला जागा उरेल म्हणून.





                                        -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

संघर्ष