माय माझी.....!
माय माऊलीया माझी...! माय माउलीया माझी, करी उन्हात ती कामं,,, होती जीवाची काहिली, न थांबे थांबता घामं....! उन्हा तान्हाचा तो डाव, चाले दिवसें दिवस,,, हात पाय ते दुखती, ना फिटे तरी कामाची हवस..! पडुन गारांचा तो सडा, होती धान्य ते आडवी,,, गोड धान्य ती सगळी आता लागते कडवी....! माय माझी रं गडयांनो नेसी फाटक लुगडं,,, मात्र मला ती नविणं बघा घालिती कापडं..! प्रेम माझ्या बी मायेचं, आहे बघा लै अफाटं,, जशी उन्हातुन छाया देई का ड्याची कुपाटं...! -- ग.सु. डोंगरे (८६०५५२२२८५)