Posts

Showing posts from 2017

एक नवा विवेकानंद.....!

माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या दरम्यानचा हा एक प्रसंग...! कॉलेज ला असताना मी आणि माझा मित्र रोज ग्रंथालयात अभ्यास करत बसायचो, खरतर मी फक्त अभ्यासाचं ढोंग करत असे, तो मात्र पक्का अभ्यासू...! सतत आमची हि गाडी चालू असायची, सर्व lectures झाले, कि सगळ्यांसोबत आणलेला डब्बा खायचा, आणि नंतर ग्रंथालयात जाऊन बसायचं, माझा मित्र, खूप sincere तो दिसण्यात हि, आणि वागण्यात सुद्धा, तसाच तो अभ्यास हि करायचा, पण मी मात्र दिस्तानाच टपोरी,, त्यात माझं वागणं आणखीनच टपोरी..! पण सगळ्यांना प्रश्न असा पडे कि इतका टपोरी दिसतो, पण हा ग्रंथालयात तासन-तास कसा बसतो, कारण टपोरी म्हंटल्यावर कट्ट्यावर बसणारं पोरग, पण माझं चित्र काही विचित्रच होतं, तसा मी मनाने साफ, आणि शुद्ध हेतू असणारा होतो, फक्त राहायला तस आवडतं,, म्हणून राहायचो..! तर अशाच आमच्या सतत चालणाऱ्या गाडी मधे अनेक प्रवाशी आम्हाला बघायचे, त्यातलाच हा एक..! ज्याचं नाव विवेक राजेंद्र खाडे... दररोज आमच्या दोघांचं निरीक्षण करे, हे आम्हाला कधी लक्षात नाही आलं, पण असच योगायोगाने, आमच्या वर्गामधे विवेक आणि त्याचा मित्र डब्बा खाण्यासाठी आले, आमचा clas

Infernal मार्क्स हे शिक्षकांनी दाखवलेलं एक अमिशच असावे...!

महाविद्यालयातील इंटर्नल मार्क्स चा पारंपरिक घोळ...! शालेय वातावरण संपवून आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, तर सुरवातीपासूनच कोण-कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे आपल्याला ठाऊक आहे. होणारी धावपळ, होणारा त्रास, त्याच बरोबर आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची भीती, मला एक समजत नाही कि हे आवडतं म्हणजे नेमकं काय बरं?.. आपण तर त्याचा काही अनुभव घेतलेला नसतो मग ते आवडतं कस बनून जातं???           असो... एकंदरीत प्रवेश मिळाला!! पुढे काय ?  मित्र-मैत्रिणींबरोबर धिंगामस्ती, enjoyment असं अगदी मस्त असं आपलं जीवन चाललेलं असतं, पण त्यालाच कुणाची तरी दृष्ट लागत असावी, कारण या सर्व गोष्टी बरोबरच internal , external परीक्षा ह्या हि खूपच महत्वाच्या असतात.              यात नेमकं होत काय..! कि वर्षभर आपण जे काही lecture करतो ना त्यातुन आपल्याला खूप काही गोष्टी लक्षात येतात, ज्या शिक्षकांबद्दल असतात..! मग त्या शिक्षकाचे आपल्याला काही समजत नसेल, किंवा त्याला त्या विषयाचे कितपत ज्ञान आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आपण प्रवेश घेण्यासाठी भरपूर fee  भरतो, मग काही जण तो पैसा उसने घ

सुशिक्षित कुणाला म्हणावं....?

कृतज्ञता व्यक्त करणाऱ्याला...! खरतर आपले अस्तित्व आहे, हे फुकट मिळालेलं आहे, असं सर्वानाच वाटत असते, म्हणून प्रत्येक व्यक्ती वित्ताच्या माघे लागतोय. पण हे जे काही आहे ते सर्व भगवंताने दिलय व तोच आपले शरीर चालवतो, हे मात्र कुणाच्या लक्षातच राहत नाही. ज्याने आपल्याला ही सृष्टी दाखवली त्या भगवंताप्रति कृतज्ञता व्यक्त करायला नको का...? आजच्या या धावत्या युगाची परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येतेच, पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी, परंपरा या बंद पडत चाललेल्या आहेत, त्या बंद करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? "मै ओर मेरी बायको, बाकी सब कायको" अशी स्थिती आजकाल आपल्याला पाहायला मिळते . अशा जगण्याला काय अर्थ? जे कि जन्माला यायचं, कमावून खायचं, आणि मरायचं!! जन्माला यायचं, आणि जगायचं आहे म्हणून नुसती आपली भूमिका पार पडायची!! या सर्व गोष्टी तर जनावर पण करतात..! "सर्वस्य चाहं, ऋधीसन्नि विष्ठो" श्रीमदभगवद्गीतेत असे म्हंटलेले आहे की सर्वांच्या हृदयात भगवंत आहे. मग त्या भागवंताची जण ठेऊन, जन्माला घातल्या बद्दल त्या प्रति कृतज्ञता, आणि आपल्या कर्तव्यांची जोपासना, पाल

तोचि गुरु जाणावा....!

तोचि गुरु जाणावा....! भारताचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे चिरंतन काळापासून चालत आलेली गुरु-शिष्य परंपरा होय. पण आजच्या जगात आपण बघतच आहोत की आजचा शिक्षक कसा आहे. सर्व जण वित्त क्मवण्यासाठीच शिक्षण घेत आहेत, मग या शिक्षणाला शिक्षण म्हणावं का? हा प्रश्न पडतो. त्याच बरोबर हे शिक्षण देणारा शिक्षक (गुरु) त्यास गुरु कसा जाणावा? हा हि एक मोठा प्रश्न पडतो. कारण तो हि वित्ता साठीच शिक्षण देत असतो. मग तो कसला गुरु!! गुरु म्हणजे अज्ञान रुपी अंधक्कार घालविणारा, निस्वार्थ शिक्षण देणारा, जो फक्त वित्तच नाही तर जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारा तसेच जीवनाचे नितीमूल्य जोपासायला लावणारा, चुकेल तिथे शिक्षा व मुकेल तेथे पाठ थोपटणारा, शुद्ध विचारशक्ती निर्माण करणारा, साधना सांगून अनुभूती देणारा, ज्याचे लक्ष्य शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसून ते फक्त त्याच्या अध्यात्मिक उन्नतीकडे ठेवेल तोच खरा गुरु...! काव्यरूपी सांगायचे झाले तर..              अज्ञानाच्या अंधक्कारातून            ज्याने आपणासी             बाहेर काढिले           तोचि गुरु ओळखावा..            मोक्षप्राप्ती, संस्कार          

वारी राजूर च्या गणपती ची...!

वारी राजूर ची...! ३० कि. मी. चा एक पाई प्रवास, सोबत मित्र कंपनी गणपती बाप्पा काय रे तुझी किमया हजारो लाखो लोक तुझ्या दर्शनाला पाई चालत ३० कि.मी. अंतर चालत येतात,, कमाल आहे बाबा, मी तर खूप विचार केला की आपल्या युगात असल्या हि आश्चर्य जनक गोष्टी घडतात??!??!?!? वेगवेगळे चित्र बघायला मिळाले, कुणी कशासाठी , तर कुणी कशासाठी कुणाला मुलबाळ पाहिजे म्हणून कुणाला चांगला नवरा पाहिजे म्हणून कुणाला चांगली बायको पाहिजे म्हणून कुणाचं दुःख हलकं व्हावं म्हणून तर कुणाच्या काही अडचणी दूर व्हाव्या म्हणून पण...... कोणी निस्वार्थ आलं होतं असं काही निदर्शनात आलं नाही का?... सगळ्यांच्या मागण्या तू पूर्ण करतो का रे? ज्यांना जे पाहिजे ते सगळं तू प्राप्त करून देतो का रे??.. कुणास ठाऊक बाप्पा , पण तसं जर असेल तर मला ही काहीतरी दे, येताना खुप जणांच्या तोंडून अपशब्द ऐकले, ते बंद करून दे!!!! खूप जणांचे तोंडं दारू/ घुटक्या चा वास/दुर्गंध मारत होते, तो दुर्गंध बंद करून दे!!!! कुणी कशी कोणावर वाईट नजर टाकून बघत होते, ती नजर सुधरू दे!!!! तुझ्याकडे हजारो, लाखोच काय, तर करोडो यावे, पण त्यातील सर्व

आयुष्य दावणीला बांधले...!

दावणीचे आयुष्य....! दावणीला जनावर दोरीनं जसे बांधले,,,, तशी माझी स्वप्नं बघा वेशीला टांगले....! स्वप्नांच्या या वाटेवर खंडीभर काटे,,,, बोचते ओ ठीक ठिकाणी आयुष्य होते छोटे...! चिंध्या चिंध्या साचून खमीज, इजार शिवले,,, पण दुष्काळानं या साऱ्या ठिगळं बघा लावले...! ना मिळाला मला थारा, ना माझ्या स्वप्नांना किनारा,,, काळ्या आईचा अन तापलेल्या गोळ्याचा आता या जीवाला सहारा.....! दावणीचे आयुष्य हे कधी राव संपेल,,,?? बेजारलेल्या या जीवाला, मोक्ष कधी मिळेल..??                         - ग. सु. डोंगरे

ये रे ये रे पावसा....!

पहिल्या पावसाचा पहिला थेंब...! पहिल्या पावसाचा पाहिला थेंब जेव्हा पडतो तेव्हा सगळ्यांची धांदल उडून जाते,,,, कुरडाया, पापड्या, खारोड्या, सांडाया यांची मात्र गाठोडी बांधली जाते...! लाहान लाहान मुले धुंद वेडे होऊन पावसाचा आनंद घेतात,,, मात्र, काही जण, काय पाऊस आहे हा... असं म्हणून छत्री च्या शोधात लागतात...! झाडांवरती साचलेली, अक्ख्या उन्हाळ्यातली धूळ चका चक करून पाणं चकाकते,,,, धरणी मातेची ताहान भागायची सुरवात तिथून होते...! खरच पावसाचा पहिला थेंब किती अजब असतो ना.....?! कुणासाठी पोटापाण्याचे मार्ग उघडे करून देतो,,,,! तर कुणाचं संकट बनून जातो...!                        -- ग. सु. डोंगरे

धून सुप्रभात....!

*धून सुप्रभाती....!* सुंदर ते ध्यान मणी पांडुरंग उभारुन दंग चांद्रभागी.....! हाती वीणा वाजे मुखी चाल बोले अंगी हरिनाम डोले भिमातीरी.....! नाथांचे मन श्लोक गाती पाहाटेच्या काळी कानी पडते भूपाळी गोदावरी तीरी....! रंग उधळतो अंगी कृष्णा वाजीतो बासरी धन्य अनंत सागरी भिमातीरी....! विठू विटेवरी उभा भाळी कपाळी कस्तुरी गंध दरवळे पंढरी चंद्रभागा....! माय माऊलीया माझी सुप्रकाळी या बोले मज स्नान घाले पंचगंगा....!            -- ग. सु. डोंगरे 🤓          💐   *(सुप्रभात)*   💐

रे पाखरा...! (नकारात्मक)

रे पाखरा...! रे पाखरा पाखरा,,, घे उंच तू भरारा....। नाही ठेवला इथे तुला,,, कोणीच रे निवारा.....।। रे पाखरा पाखरा,,,, जा पाहाडाच्या मंधी....। इथे तोडतायेत,,,, सगळे झाडाची ती फांदी....।। रे पाखरा पाखरा,,,, बघ तू आता पळवाटा....। इथली जनता विषारी,,,, झाली बाभूळाचा काटा...।। रे पाखरा पाखरा,,, तू होरे इथून फरार...। हि माणसे राक्षस,,,, देतील निरोप तुला अखेर.....।।                  -- ग. सु. डोंगरे                 (8605522285)

रे पाखरा...! (सकारात्मक)

रे पाखरा.....! रे पाखरा पाखरा,,, मन घुंगरू रे झालं...। बघ माझ्या शेतामंदी, कस हिरवं वाण आलं....।। रे पाखरा पाखरा,,, ये माझ्या तू अंगानी...। तुपा दुधात माखून, तुला देईल चारा पाणी.....।। रे पाखरा पाखरा,,, किती गोड तुझा आवाज...। जसे संगीताचा सूर,,, आणि कंठाला सोनेरी साज....।। रे पाखरा पाखरा,,, तू उनाड किती रे.....। माझे मन हि तुजसे,,,,, घेते धाव चोही रे.....।। रे पाखरा पाखरा,,,, सौंदर्य तुझं अप्रतिम....। जंगलातल्या सुळसुळणाऱ्या,,,, नागाची जशी चमचमती कातीन....।।                 -- ग. सु. डोंगरे               ( ८६०५५२२२८५)

जय महाराष्ट्र...!

महाराष्ट्र दिन....! इतिहासाच्या रक्ताने माखलेली इथली माती,,, गर्वाने बोलते आहे जय महाराष्ट्र न बाळगता कुणाची भीती.....! दिन भाग्याचा, आनंदाचा, दिन हा मंगलमय,,,, बोलतो इथला जण समाज महाराष्ट्र जय.....! मराठ्याची धरती ही, मराठ्याची वर्दी हि,,, हिंदूंची देवस्थाने, मंगल पावन धरती हि...! भगवा हातात घेऊन बोलतो इथे बच्चा बच्चा,,, हे राज्य व्हावे ये तो श्रींची इच्छा....! जय महाराष्ट्र....! जय जिजाऊ...! जय शिवराय....! जय शंभूराजे...!                      -- ग. सु. डोंगरे        (महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा)

गुरफटलेला समाज...!.

समाजा समाजा असा कसा रे समाजा ,,, असाच गुरफटुन राहशील तर, जाईल समशानात तुझा जनाजा!!! समाज काय म्हणेल, या भीतीने लोक खूप दाबून राहतात,,,, हवं ते करता येत नाही, पण ते दुसऱ्या कुणी तरी केलं याच चित्र पाहतात!!!! समाजा समाजा तू ना घोड्यावर बसून देतो ना पाइ चालू देतो,,, मधातच लटकून लटकून मात्र सगळ्यांचा जीव जातो!!!! जाती पाती कडे लक्ष देऊन तू खूप धिंगाणा घातलास,,, सर्व धर्म समभाव ही पद्धत कसा रे तू विसरलास?!!!! पोटासाठी भीक माघणारे इथे खूप जण दिसतात,,,, का रे ? तुला कधी दिसत नाहीत का कधी जे भीक मागतात!!!! असच करत राहिलास, वागत राहिलास तर कस चालेल हे जग,,?? हर एक इंसान तडपुन तडपुन मरून जाईल, मग फेड आपल्या कर्मांचे भोग!!!! समाजा समाजा असा कसा रे समाजा ?.. जरा सुधरला समाजा,,, तर होईल सगळ्या जगात आनंदाचा गाजा-बाजा!!!!!                      -- ग. सु. डोंगरे                     (८६०५५२२२८५)

कुणास ठाऊक...?

का कुणास ठाऊक....? मन हे उदास होते,, सगळं गजबजलेलं असून देखील स्वतः ला एकटे फील करते.....! का कुणास ठाऊक......? जीव कासावीस होतो,,, झालेल्या भूतकाळाचा मकरंद पुन्हा चाखायला लागतो.....! का कुणास ठाऊक....? विचारांच्या दुनियेत देह रमून जातं,, जुन्या आठवनिंचा त्रास होत असला तरी तो एकदम मज्जा घेऊन पाहतं....! का कुणास ठाऊक......? कधी का विचार येत नाही  तुला विसरायचा,,,? मनातलं दुःख सहन करत तुझ्या हसण्यातल सुख बघायचा.....! का कुणास ठाऊक ......? हे नेत्र कधी कायमचे मिटतील,,,? घडलेल्या या गोष्टींचा शेवट करून श्वास हि बंद होईल.......!                         --- ग. सु. डोंगरे

बरेच दिवस झाले

बरेच दिवस झाले बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटले नाही..! बरेच दिवस झाले , कुठे मनसोक्त फिरलो नाही म्हंटल फिरावं, पण बसलेले पाय काही जागचे उठले नाही...! बरेच दिवस झाले , काही नवीन केलं नाही म्हंटल करावं, पण मन पार गंजून गेलं त्यात काही उर्मी आलीच नाही...! बरेच दिवस झाले , कुणाची मदत केली नाही, म्हंटल करावी, पण स्वार्थी हा हात, मदती साठी कधी धावतच नाही...! बरेच दिवस झाले , मोडलेलं प्रेम जोडायचा प्रयत्न केला नाही म्हंटल जोडावं, पण हृदयाचे तुकडेच इतके बारीक होते की परत जोडताच आले नाही...! बरेच दिवस झाले , जीवन हे असच चालू आहे म्हंटल त्याला थोडं सजवावं, पण सजवायला दागिने कुठं उरलेच नाहीं...! बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही, म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटलेच नाही...!         कविता काही लिहिलीच नाही.....!                         --  ग. सु. डोंगरे