वारी राजूर च्या गणपती ची...!

वारी राजूर ची...!

३० कि. मी. चा एक पाई प्रवास,
सोबत मित्र कंपनी

गणपती बाप्पा काय रे तुझी किमया
हजारो लाखो लोक तुझ्या दर्शनाला पाई चालत ३० कि.मी. अंतर चालत येतात,,

कमाल आहे बाबा, मी तर खूप विचार केला की आपल्या युगात असल्या हि आश्चर्य जनक गोष्टी घडतात??!??!?!?

वेगवेगळे चित्र बघायला मिळाले,

कुणी कशासाठी , तर कुणी कशासाठी
कुणाला मुलबाळ पाहिजे म्हणून
कुणाला चांगला नवरा पाहिजे म्हणून
कुणाला चांगली बायको पाहिजे म्हणून
कुणाचं दुःख हलकं व्हावं म्हणून
तर कुणाच्या काही अडचणी दूर व्हाव्या म्हणून

पण......

कोणी निस्वार्थ आलं होतं असं काही निदर्शनात आलं नाही
का?...

सगळ्यांच्या मागण्या तू पूर्ण करतो का रे?
ज्यांना जे पाहिजे ते सगळं तू प्राप्त करून देतो का रे??..

कुणास ठाऊक बाप्पा , पण तसं जर असेल तर मला ही काहीतरी दे,

येताना खुप जणांच्या तोंडून अपशब्द ऐकले,
ते बंद करून दे!!!!
खूप जणांचे तोंडं दारू/ घुटक्या चा वास/दुर्गंध मारत होते,
तो दुर्गंध बंद करून दे!!!!
कुणी कशी कोणावर वाईट नजर टाकून बघत होते,
ती नजर सुधरू दे!!!!
तुझ्याकडे हजारो, लाखोच काय, तर करोडो यावे,
पण त्यातील सर्व जण निस्वार्थ तुझ्याकडे येऊ दे!!!!
आणि हे सगळं दिल्या नंतर मी येईल परत तुझ्या भेटीला,

जमेल का इतकं द्यायला???

बघ बाबा जमलं तर,
किती-किती, काय-काय प्रकार बघीतले रे बाबा घरून तुझ्या दर्शनासाठी निघालो तेव्हापासून,,,
पण तिळमात्र कळालं नाही की मी का आलो तुझ्या दर्शना साठी!!
कारण सर्व जण तुझ्याकडे काही न काही घेऊनच आलं होतं रे,
मी तर तसाच आलो,
कळालं नाही मला ही नेमकं काय पाहिजे होत तुला,

दिसत तर तुलाहि असेलच ना रे हि सगळी दृश्य??

मग का काहीच वाटत नाही का रे बाप्पा तुला??

पण काही म्हण बाप्पा, सगळ्यांचे पाय इतके दुखत होते, रडू येत होतं, तरी पण सगळे उत्साहाने तुझ्या दर्शनाला चालतच होते,
अगदी मी हि,
मज्जा मात्र खूपच येत होती,
वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले ,
काही अनुभवायला, तर काही शिकायला सुद्धा मिळाले,!!

आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे,
अशी एकंदरीत स्थिती इथली दिसत होती..!
पण त्यात तुझं नाव कोणाच्या तोंडून निघत नव्हतं,
ज्यांच्या निघालं ते हि कुणीतरी आपल्याकडे पाहावं,
यासाठी ओरडत होते,

बोटावर मोजण्या इतक्याच काही माऊल्या होत्या की त्या मनातून तुझं गुणगान गात होत्या,
त्यांचे मात्र तू सगळे दुःख, संकटं दूर कर रे,,!

बस्स बाप्पा आणखी काय सांगणार तुला?
बाकीच्यांचे हि गाऱ्हाणे ऐकून घ्यायचे आहेत तुला,
मला एकट्याला इतका वेळ देशील तर , सगळे उचलून विसर्जन करतील तुझं,

दे रे बाबा त्यांना हि काही वेळ,
आणि आभारी आहे माझं हे सगळं तू ऐकशीलच हि माझी अपेक्षा आहे,

मी हि तुझाच नावकरी,




                 (गणपती बाप्पा मोरया)

                      --  ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!