Posts

Showing posts from September, 2017

सुशिक्षित कुणाला म्हणावं....?

कृतज्ञता व्यक्त करणाऱ्याला...! खरतर आपले अस्तित्व आहे, हे फुकट मिळालेलं आहे, असं सर्वानाच वाटत असते, म्हणून प्रत्येक व्यक्ती वित्ताच्या माघे लागतोय. पण हे जे काही आहे ते सर्व भगवंताने दिलय व तोच आपले शरीर चालवतो, हे मात्र कुणाच्या लक्षातच राहत नाही. ज्याने आपल्याला ही सृष्टी दाखवली त्या भगवंताप्रति कृतज्ञता व्यक्त करायला नको का...? आजच्या या धावत्या युगाची परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येतेच, पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी, परंपरा या बंद पडत चाललेल्या आहेत, त्या बंद करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? "मै ओर मेरी बायको, बाकी सब कायको" अशी स्थिती आजकाल आपल्याला पाहायला मिळते . अशा जगण्याला काय अर्थ? जे कि जन्माला यायचं, कमावून खायचं, आणि मरायचं!! जन्माला यायचं, आणि जगायचं आहे म्हणून नुसती आपली भूमिका पार पडायची!! या सर्व गोष्टी तर जनावर पण करतात..! "सर्वस्य चाहं, ऋधीसन्नि विष्ठो" श्रीमदभगवद्गीतेत असे म्हंटलेले आहे की सर्वांच्या हृदयात भगवंत आहे. मग त्या भागवंताची जण ठेऊन, जन्माला घातल्या बद्दल त्या प्रति कृतज्ञता, आणि आपल्या कर्तव्यांची जोपासना, पाल