Posts

Showing posts from January, 2018

गोवा एक अविस्मरणीय क्षण...!

सफर गोव्याची...! गोवा,, म्हणजे जन्नत, कॅसिनो, पार्टी, मज्जा, बीच अशा संकल्पना असलेलं मनातलं एक शहर, योगा योगाने योग आला, आणि गणेश आपला गोव्याला निघाला.! सोबत आत्याची फॅमिली माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर लटांबळ,, 18 जानेवारी 2018 ची हि कथा, अर्थात तिला व्यथा म्हणलं तरी हरकत नाही, त्याच कारण कळेलच तुम्हाला! 18 जानेवारी म्हणजे माझ्या जन्मदिवसाच्या अगदी जवळचा, म्हणजे दोन दिवस आधीचा दिवस..! खरंतर जायची इच्छा काही होत नव्हती, कारण दोन दिवसावर जन्मदिवस आला होता, कॉलेज च्या सर्व फ्रेंड्स ना सोडून तिकडे जावसं हि वाटत नव्हतं, पण मनाची दुसरी बाजू भोकली, चल ना भो, गोवा आहे, तिकडे जन्मदिवस, म्हणजे मज्जाच मज्जा, एक मन नको तर एक मन हो,, हा मनाचा खेळ सतत सुरु असतो, म्हणून असा निर्णय घेतला की गोवा ला कढीपन जाऊ, इथले मित्र परत कधी भेटतील का, म्हणून इथं यांच्या सोबत जन्मदिवस साजरा करू! ठरलं पण कॉलेज वरून घरी गेलो आणि कानावर अत्त्याचे शब्द पडले, बॅग भरून ठेव बरका, परवा पहाटे 5 ला ट्रेन आहे.      मग म्हंटल मला तर नाही यायचं ना, तर असं ऐकलं कि तुझं पण रिझर्वेशन केलंय, डोक्यात नुसती कालवा कालव होत ह

Happy संक्रांत....!

संक्रांति चा काळ तो मंगल, पतंग उडवूनि करू ती दंगल..! गुळाचा गोडवा, तिळाच्या लाडवा,, ओठात ठेवुनी, मनास भिडवा...! मनातले विचार, समाजातले आचार,,, सुधारून त्यांना, देऊ सुविचार...! गोड गोड बोलणे तर सुरूच ठेवावे, पण नेहमी ते स्वार्थाशिवाय असावे..! जीवन आपले होऊनि गुळासारखे, मोत्यांनी सजवू त्याला तिळासारखे....! संक्रांतीच्या शुभेच्या गोड गोड,,, आपल्या सर्व वाईट गोष्टींची व्हावी मोडतोड..!! शुभेच्या घ्या आणि गोड गोड बोला,,                -- ग. सु. डोंगरे (गोड गोड बोला, गोड बोलून फसवू नका....!)

ब्रम्हगिरी पिकनिक...!

त्र्यंबक ब्रम्हगिरी ची दिंडी...! वारकरी भक्तगण पाई आणि आम्ही क्लासमेट्स बस ने, भक्तांची बिचारी भोळी श्रद्धा, दूरवरून पाई येत होती, आम्ही मात्र आमच्या एंजॉय चा भाग म्हणून पिकनिक म्हणून निघालेली...! कळत नव्हतं मनाला, आणि पटत हि नव्हतं कारण दोन्हीचे हि मार्ग एक, ठिकाणं हि एकच पण उद्देश मात्र वेगळा, खूपच वेगळा.. नेमकं आम्हाला तरुणाईचं भूत चढलं होतं का त्यांना म्हातारपणात देव देव करायचं सुचलं होतं हे काही कळायला तयारच नव्हतं...! जीवन हे असंच आहे, आहे त्याचा आनंद कोणालाच नाही..! नजर दोन्हीकडे हि फिरत होती एकीकडे क्लासमेट्स चे उत्सुकतेने भरलेले चेहरे पाहून मजाही येत होती, आणि दुसरीकडे अनवाणी, काहींच्या हातात भगवा पताका, तर काहींच्या हातात विना, मृदंग, टाळ आणि चिपळ्या घेऊन भाळी अष्ठगंधाचा टिळा, असणारा साधा भोळा माझा वारकरी....! एकीकडे पिच्चर चे गाणे, तर दुसरीकडे हरिनाम डोले, एकीकडे डीजे रॅप, तर दुसरीकडे मृदंगाचा नाद, कळत नव्हते मजला ओढवू कुणीकडे स्वतःला,,,, आजोबांसोबत चा तो कीर्तनाचा क्षण का जवणीच्या जोशातला होळी चा रंग..! एकीकडे असं वाटायचं तरुणाईत असताना मजा घ्य