ब्रम्हगिरी पिकनिक...!

त्र्यंबक ब्रम्हगिरी ची दिंडी...!

वारकरी भक्तगण पाई
आणि आम्ही क्लासमेट्स बस ने,
भक्तांची बिचारी भोळी श्रद्धा,
दूरवरून पाई येत होती,
आम्ही मात्र आमच्या
एंजॉय चा भाग म्हणून
पिकनिक म्हणून निघालेली...!
कळत नव्हतं मनाला,
आणि पटत हि नव्हतं

कारण दोन्हीचे हि मार्ग एक,
ठिकाणं हि एकच
पण उद्देश मात्र वेगळा, खूपच वेगळा..

नेमकं आम्हाला तरुणाईचं भूत चढलं होतं
का त्यांना म्हातारपणात देव देव करायचं सुचलं होतं
हे काही कळायला तयारच नव्हतं...!

जीवन हे असंच आहे,
आहे त्याचा आनंद कोणालाच नाही..!

नजर दोन्हीकडे हि फिरत होती
एकीकडे क्लासमेट्स चे उत्सुकतेने भरलेले चेहरे पाहून मजाही येत होती,
आणि दुसरीकडे अनवाणी, काहींच्या हातात भगवा पताका, तर काहींच्या हातात विना, मृदंग, टाळ आणि चिपळ्या घेऊन भाळी अष्ठगंधाचा टिळा, असणारा साधा भोळा माझा वारकरी....!

एकीकडे पिच्चर चे गाणे,
तर दुसरीकडे हरिनाम डोले,
एकीकडे डीजे रॅप,
तर दुसरीकडे मृदंगाचा नाद,

कळत नव्हते मजला
ओढवू कुणीकडे स्वतःला,,,,
आजोबांसोबत चा तो कीर्तनाचा क्षण
का जवणीच्या जोशातला होळी चा रंग..!

एकीकडे असं वाटायचं
तरुणाईत असताना मजा घ्यायची
तर दुसरीकडे असं वाटायचं
मग शरीराचा चोथा झाल्यावरच का देवाची आठवण काढायची??

एकीकडे आमच्या हातात मोबाईल,
आणि कानात हेडफोन्स
दुसरीकडे हातात भगवा पताका, मुखात हरीचे हरीचे बोल,
एव्हढच नव्हे तर पाई चालून हि उत्साह इतका कि तो आमच्या पिकनिकच्या उत्साहा समोर आभाळा एवढा होता,,

कळत नाही आक्ख आयुष्य संपेपर्यंत कधी त्या देवाची आठवण देखील येत नाही, अली तरी ती फक्त काही हवं असेल तर येते, ती हि ते मिळेपर्यंतच,,
नंतर कोण देव आणि कुठला देव,

मग म्हातारपण आल्यावरच अर्थात आपल्या शरीराचा चोथा झाल्यावरच त्याच्या कामाला लागायचं,
जेव्हा आपण ताजे तवाने असतो तेव्हाच का त्याच्या पायथ्याशी वाहून घेत नाही??
सुकून, चोथा झाल्यावरच त्याची का आठवण!??

असो...!

पोहोचलो आम्ही पायथ्याशी
निघालो वरती
आमच्या पेक्षा, आमच्याच काय आमच्या बाबाच्या वयापेक्षा हि मोठाली व्यक्ती अगदी सहज पायऱ्या चढत होते,
आणि आम्ही दहा पाहायऱ्या चढून नाही झाल्या की बसण्यासाठी जागा शोधायचो,
माझे लक्ष तर हजार वेळा त्या शिखराकडे जायचे, कि कधी पोचेल कधी पोचतो असं म्हणत, एका माघे एक पाऊले चालतच होती, तसे तसे पाय हि कळवळत होते,

पण सोबतीला म्हातारी माणसं, ते कि मस्त चालत होती,
माझ्या जवानी समोर त्यांचं म्हातारपण हि लाजवत होतं मला,
दम भरून एका माघे एक पाऊल टाकून वेगाने शिखराकडे बघत धावत निघालो,
ग्रुप तर केव्हाच माघे पडून गेला,
हळू हळू ग्रुप मधली काही मंडळी हि थकून गेली, काहींनी तर अर्ध्यातूनच माघे जाण्याचा निर्णय घेतला,
असं करत करत शेवटी मंदिरा जवळ पोहोचलो,
मन असं शांत झालं, जेव्हा त्या महादेवाच्या पिंडीवर मस्तक टेकवलं,
पण अजून हि शिखर गाठलं नव्हतं, ते थोडं दूर आणि वरती होत,
तिथं तर जायचच,
सगळे येईपर्यंत मंदिरात थांबलो, नंतर परत त्या टोकाकडे नजर देत, "आपल्याला तिथे जायचं" म्हणून तिकडे चालते झालो,,.

अखेर वरच्या टोकाला पोहोचलो
मनात असं वाटत होत की जसकाय खूप मोठी लढाई जिंकलो,
किंवा काहीतरी ध्येय होतं ते गाठलं,
तो आनंद गगनात मावत नव्हता, जोरजोरात ओरडून आभाळाला सांगावस वाटत होतं,
तो आनंद काही वेगळाच होता,

खरच ते शिखर पाहून जस त्याच्या टोकाशी जायची जिद्द पेटून उठली होती तशीच आता जीवनाच्या ध्येयाचे शिखर गाठण्याची जिद्द पेटावीशी वाटतिये,
तो आनंद काय असेल???...!

           - ग. सु. डोंगरे
        (८६०५५२२२८५)

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!