बरेच दिवस झाले

बरेच दिवस झाले

बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही
म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटले नाही..!

बरेच दिवस झाले , कुठे मनसोक्त फिरलो नाही
म्हंटल फिरावं, पण बसलेले पाय काही जागचे उठले नाही...!

बरेच दिवस झाले , काही नवीन केलं नाही
म्हंटल करावं, पण मन पार गंजून गेलं त्यात काही उर्मी आलीच नाही...!

बरेच दिवस झाले , कुणाची मदत केली नाही,
म्हंटल करावी, पण स्वार्थी हा हात, मदती साठी कधी धावतच नाही...!

बरेच दिवस झाले , मोडलेलं प्रेम जोडायचा प्रयत्न केला नाही
म्हंटल जोडावं, पण हृदयाचे तुकडेच इतके बारीक होते की परत जोडताच आले नाही...!

बरेच दिवस झाले , जीवन हे असच चालू आहे
म्हंटल त्याला थोडं सजवावं, पण सजवायला दागिने कुठं उरलेच नाहीं...!

बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही,
म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटलेच नाही...!
        कविता काही लिहिलीच नाही.....!

                        --  ग. सु. डोंगरे









Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!