कुणास ठाऊक...?

का कुणास ठाऊक....?
मन हे उदास होते,,
सगळं गजबजलेलं असून देखील
स्वतः ला एकटे फील करते.....!

का कुणास ठाऊक......?
जीव कासावीस होतो,,,
झालेल्या भूतकाळाचा मकरंद
पुन्हा चाखायला लागतो.....!

का कुणास ठाऊक....?
विचारांच्या दुनियेत देह रमून जातं,,
जुन्या आठवनिंचा त्रास होत असला
तरी तो एकदम मज्जा घेऊन पाहतं....!

का कुणास ठाऊक......?
कधी का विचार येत नाही  तुला विसरायचा,,,?
मनातलं दुःख सहन करत
तुझ्या हसण्यातल सुख बघायचा.....!

का कुणास ठाऊक ......?
हे नेत्र कधी कायमचे मिटतील,,,?
घडलेल्या या गोष्टींचा शेवट करून
श्वास हि बंद होईल.......!

                        --- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!