गुरफटलेला समाज...!.

समाजा समाजा असा कसा रे समाजा,,,
असाच गुरफटुन राहशील तर,
जाईल समशानात तुझा जनाजा!!!

समाज काय म्हणेल, या भीतीने लोक खूप दाबून राहतात,,,,
हवं ते करता येत नाही, पण ते दुसऱ्या कुणी तरी केलं याच चित्र पाहतात!!!!

समाजा समाजा तू ना घोड्यावर बसून देतो ना पाइ चालू देतो,,,
मधातच लटकून लटकून मात्र सगळ्यांचा जीव जातो!!!!

जाती पाती कडे लक्ष देऊन तू खूप धिंगाणा घातलास,,,
सर्व धर्म समभाव ही पद्धत कसा रे तू विसरलास?!!!!

पोटासाठी भीक माघणारे इथे खूप जण दिसतात,,,,
का रे ? तुला कधी दिसत नाहीत का कधी जे भीक मागतात!!!!

असच करत राहिलास, वागत राहिलास तर कस चालेल हे जग,,??
हर एक इंसान तडपुन तडपुन मरून जाईल, मग फेड आपल्या कर्मांचे भोग!!!!

समाजा समाजा असा कसा रे समाजा?..
जरा सुधरला समाजा,,,
तर होईल सगळ्या जगात आनंदाचा गाजा-बाजा!!!!!

                     -- ग. सु. डोंगरे
                    (८६०५५२२२८५)

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!