ये रे ये रे पावसा....!

पहिल्या पावसाचा पहिला थेंब...!

पहिल्या पावसाचा पाहिला थेंब जेव्हा पडतो
तेव्हा सगळ्यांची धांदल उडून जाते,,,,
कुरडाया, पापड्या, खारोड्या, सांडाया
यांची मात्र गाठोडी बांधली जाते...!

लाहान लाहान मुले धुंद वेडे होऊन
पावसाचा आनंद घेतात,,,
मात्र, काही जण, काय पाऊस आहे हा...
असं म्हणून छत्री च्या शोधात लागतात...!

झाडांवरती साचलेली, अक्ख्या उन्हाळ्यातली
धूळ चका चक करून पाणं चकाकते,,,,
धरणी मातेची ताहान भागायची
सुरवात तिथून होते...!

खरच पावसाचा पहिला थेंब किती अजब असतो ना.....?!
कुणासाठी पोटापाण्याचे मार्ग उघडे करून देतो,,,,!
तर कुणाचं संकट बनून जातो...!

                       -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!