आयुष्य दावणीला बांधले...!

दावणीचे आयुष्य....!

दावणीला जनावर
दोरीनं जसे बांधले,,,,
तशी माझी स्वप्नं
बघा वेशीला टांगले....!

स्वप्नांच्या या वाटेवर
खंडीभर काटे,,,,
बोचते ओ ठीक ठिकाणी
आयुष्य होते छोटे...!

चिंध्या चिंध्या साचून
खमीज, इजार शिवले,,,
पण दुष्काळानं या साऱ्या
ठिगळं बघा लावले...!

ना मिळाला मला थारा,
ना माझ्या स्वप्नांना किनारा,,,
काळ्या आईचा अन तापलेल्या
गोळ्याचा आता या जीवाला सहारा.....!

दावणीचे आयुष्य
हे कधी राव संपेल,,,??
बेजारलेल्या या जीवाला,
मोक्ष कधी मिळेल..??

                        - ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!