तोचि गुरु जाणावा....!

तोचि गुरु जाणावा....!

भारताचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे चिरंतन काळापासून चालत आलेली गुरु-शिष्य परंपरा होय.

पण आजच्या जगात आपण बघतच आहोत की आजचा शिक्षक कसा आहे. सर्व जण वित्त क्मवण्यासाठीच शिक्षण घेत आहेत, मग या शिक्षणाला शिक्षण म्हणावं का? हा प्रश्न पडतो.
त्याच बरोबर हे शिक्षण देणारा शिक्षक (गुरु) त्यास गुरु कसा जाणावा?
हा हि एक मोठा प्रश्न पडतो.
कारण तो हि वित्ता साठीच शिक्षण देत असतो. मग तो कसला गुरु!!

गुरु म्हणजे अज्ञान रुपी अंधक्कार घालविणारा,
निस्वार्थ शिक्षण देणारा,
जो फक्त वित्तच नाही तर जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारा तसेच जीवनाचे नितीमूल्य जोपासायला लावणारा,
चुकेल तिथे शिक्षा व मुकेल तेथे पाठ थोपटणारा, शुद्ध विचारशक्ती निर्माण करणारा, साधना सांगून अनुभूती देणारा,
ज्याचे लक्ष्य शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसून ते फक्त त्याच्या अध्यात्मिक उन्नतीकडे ठेवेल तोच खरा गुरु...!

काव्यरूपी सांगायचे झाले तर..
     
       अज्ञानाच्या अंधक्कारातून
           ज्याने आपणासी
            बाहेर काढिले
          तोचि गुरु ओळखावा..

           मोक्षप्राप्ती, संस्कार
           सुख शांतीची निस्वार्थ
          प्राप्ती करून देणारा
          तोचि गुरु जाणावा...

             ग. सु . डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!