संघर्ष

जीवन एक संघर्ष

खूप कठीण असतात काही गोष्टी
सगळं असून देखील समाधान नसत
गरजा आपल्या भागत नाही म्हणून
दुसऱ्याचे लुगडे धुवावे लागतात

का दिल देवाने असे आयुष्य?
ज्यात बिलकुल चव नाही
अशी कोणतीच गोष्ट नसेल
जिची आम्हाला हाव नाही

जीव तरसून जातो
ती चॉकलेट ची आईसक्रीम खायला
पण खिशात नसते पैसे
तिचा वास देखील घ्यायला

नोकर दार म्हणून राहणं सोपं नव्हे
त्यात ही खूप कष्ट सोसावे लागते
हक्काचे पैसे जरी माघितले
तरी आपल्यालाच हाकलून दिले जाते

कुठपर्यंत असाच डाव चालत राहणार?
कधी मला मनसोक्त जीवन जगायला भेटणार?
हा प्रश्न कधी नाही सुटणार..!
यातच माझं आयुष्य पूर्णपणे संपणार..!

                      -- ग. सु. डोंगरे
          














Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!