सकाळ न्यारी

*सुमंगल प्रभात*

सकाळ च्या या मंगल समयी
फूलते अंगणी सुगंधी कळी ।
भोळा संत गातो भक्ति गीतं
लाउनी चंदनाचा टीळा भाळी ।।

गाती पक्षी ही बोबडे
चिव चिव करीत मधुर स्वरांनी ।
लव लवती ती रोपटे
डोलते टाळी वजवत पानांणी ।।

सूर्य नारायण बघतो
टाकत छटा केशरी रंगाची ।
चम चम लख लख करते
हिरवी शाल ही पृथ्वीची ।।

उघडावे अपुले डोळे
येता सूर्य देव तो ऊरी ।
बोलत राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी ।।

          *सुप्रभात*

               -- *ग. सु. डोंगरे*🤓

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!