राजा शिवछत्रपती..!

राजा माझा छत्रपती!!

गर्वाने बोलते आजही इथली माती,,,
माझा राजा शिवछत्रपती...

सह्याद्री च्या कऱ्या कपारी घुमतो आवाज,
हर हर महादेव,,,,
याच आवाजाने बनतात मराठी अतूट नाती,
माझा राजा शिवछत्रपती....

मावळे जमा करून स्वराज्य स्थापन करण्याची होती ज्याची ख्याती,
असा माझा राजा शिवछत्रपती....

स्वराज्याचा आधार तो , शेतकऱ्या चा बळीराजा तो,
त्यांच्या साठीच झिजविल्या त्यानी तलवारीच्या पाती,
असा माझा राजा शिवछत्रपती.....

क्षत्रिय कुलावतंस म्हणता सळसळते रक्त भूवरी,
नाव घेता त्या राजाचे शहारे येतात अंतरी,
राजा एकच होता गडपती, अश्वपती,,,
तो माझा राजा शिवछत्रपती.....

                    --  ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!