शिवजयंती...!

झाली काल शिव जयंती🚩

मस्त, झक्कास, सुपर,,,,

खरच राजे।।
३८५ वर्ष झाले तुम्ही जाऊन।

अजुन पण इतके फ़्यान आहेत तुमचे।
जल्लोशाने नाचत होते काल मिरवनुकित।
आयला अस वाटत होत की खरच गर्व आहे की इतके मावळे आहेत आपल्या गावात।

मग एक प्रश्न पडला?❓
जर एवढे मावळे आहेत तर का हे सगळ घडतयं????~
(भृष्टाचार,बलात्कार,जातिवाद,गरीबी,लाचारी,दुष्काळ ई.)

मग थोड़ा विचार केला।।।
बरकाइने लक्ष्य घातलं।।
निरीक्षण केलं।।।

मग काय??....
काल माहाराजांचि मिरवणूक।
त्यांच्या मुर्तिला ठेवण्यासाठी रथ आनला होता।

सर्व प्रथम DJ अनला, ६ बेस चा।
नंतर मावळे तयार झाले, खरतर त्याना मावळे म्हणता येनारच नाही।

झाले तयार, भगवे फेटे, पांढरे कपड़े कपाळी चंद्र कोर ई.
हजार वेळा अरशाला विचारत..
मी कसा दिस्तोय?
मिरवणूक बघनाऱ्या पोरी माझ्याकड बघतील ना..

अवरल..

मग रथ सजवला।
महाराजांची मूर्ती रथात थेवायची होती।
मग काय उचल्ली मूर्ती,
माझ निरीक्षण चालूच, काय करणार 🚩राजा शिवछत्रपती🚩 परीवारातला ना मी.

अहो काय सांगू हो..

तीळ् मात्र आदर दिला नाही हो या नालायकानी..|
अहो पायात बुट चप्पल तशिच आणि उचल्ली हो राजेंची मूर्ती।।
तोंडात घुटखा तम्बाकू ही होती हो।
माझ्या भाषेत म्हनायच झाल तर (गु)।

तशाच हातानी राजाची मूर्ती उचल्ली हो..

ते झालच।
पण रथात जे होते मूर्ती वर घेण्यासाठी त्यांची ही तिच अवस्था, जशी खालच्यांचि होती...

खुप आग आग झाली हो कालजात हे सर्व बघुन।

झाल रथ तयार निघाली मिरवणूक वाजत गाजत,,
मग कोनी मकड आला की रथाजवळ जायचा आणि सेल्फ़ी काढ़ायचा हो....

पण एकही असा दिसला नाही की तो नतमस्तक झाला..

झाला DJ सुरु।।
काय गाने हो ते..

लगनातल्या वरातीत वाजवल्या सारखे।
अहो राजे तुमची जयंती होती का वरात चाल्लीए हेच समजत नव्हतं।।

डोक्यावर बघवा फेटा।
कपाळावर चन्द्र कोर।
हातात राजमुद्रेच ब्रासलेट।
बोटात राजमुद्रेचि अंगठी।
काय शोभुन दिसत असेल ना हा शिवभक्त,,,

पण दुरदैवाचि गोष्ट राजे..
याच भक्ताच्या तोंडात गु, दरु, सिगारेट..

राजे तुमच्या मिरवनुकित फक्त भगवे वादळ दिसायला पाहिजे.

पण इथे पुडया, दरुच्या बातल्या दिसत होत्या राजे।

मग हे कसले मावळे??
जे की फक्त एन्जॉय करण्यासाठी तुमची जयंती साजरी करताएत..
अरे हे तर सगळे बावळी आहेत।
त्याना कळत नाहीए राजे की ते तुमची मिरवणूक काढून तुमचच नाव खराब करताएत राजे।।

माहितिए राजे तुम्हाला हे सर्व दिसत असेल राजे, तुम्हाला पण त्याचा खुप त्रास होत असेल राजे।

माफ़ करा राजे ह्या सगळ्याला आवर घलायला थोड़ा वेळ लागेल।
पण वचन आहे राजे।
माझा
(🚩राजा शिवछत्रपती🚩) परिवार हे नक्कीच करील...

कारण या परीवारात अस्सल मावळे भेटतील राजे तुम्हाला..

फक्त एवढंच माघन आहे राजे

आम्हाला आशीर्वाद , ताकत द्या।
तुमचे लक्ष्य ही असु द्या।

🚩जय शिवराय🚩

ग. सु. डोंगरे🚩
!राजा शिवछत्रपती परिवार माहाराष्ट्र!

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!