कॉलेज...!

कॉलेज चा कट्टा...!
एक दररोजचा तिच्या सोबतचा प्रवास!!

दररोज सकाळी लवकर उठायचं
पटा पाटा अवरायचं
स्टॉप वर जायचं
आणि तिची वाट पाहात बसायचं....!

तीने मात्र तिच्या वेळेवरच यायचं
आपन मात्र तिची वाट पाहात
कोवळ्या उन्हात तळत राहायचं
कॉलेज ला जाताना मी तिच्या सोबतच रहायचं
नाव तिच बस असायचं...!
तिच माझी सोबती
नाव तीच एसटी असायचं..!

कॉलेज ला उतरायचं
उतरताच ऐश्वर्या, दीपिका, कैटरीना, यांचे बिना मेकअप चे चेहरे बघत चालायचं..!

बिल्डिंग च्या गेट वर पोचलो की शीपुर्डया ने आय कार्ड विचारायचं
आय कार्ड आहे बॅग मधे अस खोट नाटक करुण मनातल्या मनात याच्या आयचा घो,, अस म्हणत आत निघुन जायचं...!

क्लास मधे जाताच सगळ्या ना एक गुलाबाच्या फुलासारखी स्माइल देऊन आपल्या बाकावर जाउन बसायचं..!

थोड़याच वेळात मास्तरानी जीव घ्यायला यायचं
एक दिड तास त्यांच लेक्चर देऊन आपल्या डोक्याला अभाळाएवढ टेंशन देऊन जायचं...!

एका पाठोपाठ एक अशे तीन चार लेक्चरांच राजकारण चालत राहायचं
ते कसबस संपाउन मग क्लास मधल्या मित्रांना बोलायचं
झालेल्या गोड भुतकाळातल्या गोष्टींची माळ जपत बसायचं.....!

हळू हळू पोटातुन वेग वेगळे प्राणी ओरडायला सुरु व्हायचं
तितक्यात कोनी तरी म्हनायचं
ए खुप भुक लागली ना आपन आधी जेउण घेउ ना..
सर्व जणांनी आप आपला डब्बा काढून समोर मांडून बसायचं

आपल्या डब्यात काय आहे ते सोडून बाकिच्यांच्या डब्यात डोकायचं
आणि सतरा जन्मांचे उपाशी असल्या सारख एकमेकांच्या डब्यावर तुटुन पड़ायचं...!

थोड़याच वेळात सगळ पोटात टाकून पोटाच्या भुकेला तृप्त करायचं
पोटाची भुक भागवुन डोक्याच्या मघे लागायचं...!
अर्थातच अभ्यासाच ढोंग करत बसायचं...!

नेटकच पुस्तक काढून एकमेकांसोबत गप्पा मारत बसायचं
त्याच बरोबर एकमेकांच्या खोडया कढ़त मज्जा घेत बसायचं

मग घड्याळाच्या काटयाकडे बघत एक एकाने बाय बाय म्हणत निघुन जायचं
आपन मात्र सगळ्यांना वाट लावत लावत शेवट पर्यन्त इथेच बसायचं

तिच्या यायच्या वेळेवर
आपन पन उरकायचं
आणि सगळ आवरुन परत बहेरच्या गेट कडे निघायचं

जाता जाता गेट वरच्या शिपुर्डया ला प्रेमाने बाय बाय मामा अस म्हणायचं
परत स्टॉप वर जायचं
तिची वाट बघत बसायचं

तीने मात्र तिच्या वेळेवरच यायचं
आपन मात्र तिची वाट पाहात
शांत उन्हात तळत राहायचं
जाताना मी तिच्या सोबतच रहायचं
नाव तिच बस असायचं...!
तिच माझी सोबती
नाव तिच एसटी असायचं...!

                          - ग. सु . डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!