कौतिक तिचे


कौतुक तुझे

गोर गोमटं रूप तुझे
गोरे गोरे गालं
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं..

मासोळी वाणी डोळं तुझं
करत माझे हालं
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं..

कोळशा वाणी केस काळे,
बो, रे लाले लाल
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं...

अंगुरा वाणी ओठ तुझे
करते मला ओलं
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं...

हात तुझे कपसावाणी
नरम लई सोलं
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं...

पाय तुझे मोरपिसं
भारी त्यांचा तोलं
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं...

दिसती तू ग परी वाणी
कौतिक तुझ केलं
गाव बी म्हणत झाक तुझा हाई र गड्या मालं...

                             -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!