नाते आपले निसर्गाशी जिव्हाळ्याचे ठेऊ..!

फुल किती गोड असत, पण आयुष्य त्याच थोडं असत...!

फुलाचं आणि मानवाचं काही वेगळंच नातं,
फुल दोनच दिवस जगत, मात्र एक आगळीच ओढ लावून जात..!

गुलाबाचा सुगंध आता बाटलीत येऊन पडलाय,
म्हणून आता गुलाब मात्र रस्त्यावर जाऊन सडलाय!!

नारळाचे पाणी आता पडत मारूतीच्या माथी..!
कारण कोकोनट ऑइल आता भेटतय ना आपल्या हाती..!

गोड-गॉड ऊस आपला मशीन मध्ये जाऊन चेपला,
पण बघा ना,
आपण त्याचा रस किती आनंदाने चाखला..!

जमिनी वरची झाड आता , कुंडी मधे आली!
त्यातच मानवाने झाड लावण्याची हौस पूर्ण केली.

कुंडी मध्ये कोंडी त्याच्या वाढण्याची झाली,
प्रदूषणाची वाढ होऊन, झाली जनता दवाखान्याची वाली..!

मोठं मोठे नेते आता वृक्षा रोपण चा कार्यक्रम हाती घेतात,
वृक्षा रोपण करण्या साठी,  जंगले सगळी तेच तोडायला लावतात.

प्राण वायू संपून संपुन शेवट त्याचा येईल,
नंतर आपल्या आयुष्याची दशा कशी होईल?..

म्हणून म्हणतो,
नाते आपले निसर्गाशी जीव्हाळ्याचे ठेऊ,
"निसर्गाची काळजी घेईल"! शपथ अशी घेऊ.
      शपथ अशी घेऊ.....!

   !!! !!!!!!!!!!!!धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!!
                               - ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!