दुष्काळ

दुष्काळाच्या झळा

किती सोसते ही धरणी या दुष्काळाच्या झळा
पाण्यावाचून सुकलाय इथं शेतकऱ्याचा मळा

या सरकार पण लावतं वेगळाच लळा
5 वर्ष कापतो तो आपल्या जनतेचा गळा

झाडे तोडून तोडून इथं शिजतात मटण
माझ्या धरती वरच्या पाण्याची पातळी एकदा पूर्ण पणे घटनं..!

शेतकरी आमचा राजा,आता झाला तो भिकारी
पाण्या साठी हिंडतात वन वन त्याची पोर सारी

ना अंगाला भेटतात चिंध्या ना भेटत एखादं लुगडं,
गरीबीने इथं केलं आता त्यांनाच नागडं

किती ओरडून ओरडून सांगू मी त्यांची ती व्यथा??
पाण्यावाचून सुकलाय देश सारा काय सांगू त्याची कथा?...!

अरे वाचवा त्या राजाला ह्या दुष्काळाच्या झळा पासून,
हळू हळू घेत आहे तो आपलंच अस्तित्व पुसून..!

सोसून सोसून गळा आपला लावला त्याने फासाला,
आता त्याचेच लेकरं शोधत आहेत पाणी त्याच्या दिवसाला,
    पाणी त्याच्या दिवसाला.....!

                           -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!