गरिबी....!

हे भगवंता , नको बनाऊ रे कुणाला
गरीब/भिकारी...

लाज वाटते स्वतः ची, जेव्हा नजर जाते त्यांच्याकडे....
जे पैश्याने माजलेले आहेत त्यानाही शिकव ना, जरा चांगले धडे....

जीव कासाविस होतो रे, जेव्हा कुणी पोट भरवन्यासाठी भाकर माघत असते...
ज्याना अन्नाची कदर नाही, बर झाल असत जर त्याना ही भीक माघुन खायचे दिवस दाखवले असते.....

जो खुप श्रीमंत आहेत, तोच पैसा कमवतोय, पण जो गरीब आहे, भुकेवाचुन मरतोय...

त्याच श्रीमंताना जरा दान धर्माची पद्धत शिकवली असती तर बर झाल असत,,

निदान आजच्या गरीबाला भीक माघन्याची वेळ तरी आली नसती...

देवा....!
तु अक्खा मानुस चालवतो रे,,
पण का कुनास ठाऊक कधी हा विचार का केला नाहिस,

की एकदा मानसांचे विचार करण्याचे दृष्टिकोण चालवले असते...

मानसाला जगन्यासाठी प्राणवायु पेक्षा आज च्या जगात चांगल्या विचारांची गरज आहे,

बघ तेवढ़ करता आल तर बर झाल असत...

कारण एकदा चांगले विचार आले की, प्राण वायु आपोआप उपलब्ध होईल.....!

                       --- ग. सु. डोंगरे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!