कोरोना...!

'आयुष्यातली एक स्वप्नागत हकिगत'.

काही दिवसांपूर्वी चायना मधून एका नवीन रोगाचा उदय झाला त्याला उद्रेकही म्हणता येईल, त्याचे नाव 'कोरोना'. ही बातमी कानावर आल्यानंतर अगदी सहज घेतल गेलं. हे कदाचित ह्यामुळे की आजपर्यंत असंख्य असे viruses आले आणि गेले, त्यामुळे खुप काही नुकसानही झाले पण त्याचा त्रास अपल्यापर्यंत पोहोचला नाही. त्याचे खरे कारण म्हणजे आपल्या रक्षणासाठी अदृश्य असे कवच आहेत ते म्हणजे आर्मी, महाराष्ट्र पोलिस, प्रशासन, डॉक्टर्स आणखी खुप लोकं,  ज्यांच्यामुळे त्या रोगांची झळ आपल्या पर्यंत पोहोचली नाही. पण कदाचित त्या गोष्टींचे गांभीर्य आपल्याला कधी वाटले नसावे.
        असो....
        काही दिवसांपूर्वी ही बातमी कळाली त्यावेळी मी देखील ही बातमी सगळ्यांसारखी casually घेतली, आणि मुंबई मधे नवीन जॉब, नवीन कामाची उमेद (HOSPITAL LIFE) जगत होतो. जॉइन झालो आणि त्यानंतर एका अाठवड्यातच एक व्यक्ति गवसला, ज्याला कोरोनाची लागन झालेली होती. तोपर्यंत तर मी या कोरोना आणि त्याच्या बातम्यापासून वंचितच होतो. कधी तरी मोबाइल उघडला की तेच दिसायच पण त्यावर मी विश्वास ठेवत नाही. ती एक केस गवसल्या नंतर सगळीकडे अफरा-तफर माजली, प्रशासन जाग झालं, वेगवेगळे नियम, सूचना मिळू लागल्या! पन माझा मात्र तोच Casual Approach होता. 'काय होईल!' 'कशाला ते मास्क लावायचं'!? 'काय होणारे त्याने'!? कोरोना व्हायचाच असेल तर कसाही होईल! असे बोलून मी मात्र जैसे थे!. पण दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढतच चालली, बऱ्याचशा संस्थाना, कंपन्याना सुट्टी, किंवा वर्क फ्रॉम होम दिलं गेलं. आम्ही मात्र BMC हॉस्पिटल मधले लोक, आम्हाला मात्र दररोज जावच लागे आणि रोज सकाळी घरा बाहेर निघालो की सर्व तोंड मास्क लावल्याचे दिसायचे आणि आपण मास्क घातलेल नाही त्यामुळे ते असे बघायचे की जसकाय खुप मोठा अपराध केला. दिवसेंदिवस ट्रेन मधली गर्दी सुद्धा कमी झाली, मोजके लोक असायचे आणि कोरोना ने बाधित रुग्णाची संख्या ही गतीने वाढत होती, आशा परिस्थितीत घरचे काळजीत पडले, आणि फोन करुण बोलून घेत होते पण मी मात्र कोरोनाचा जावाई असल्यासारख त्यांना म्हणायचो की ' मला कसला कोरोना होतो, उलट मीच कोरोनाला होईल'. असे बोलून हसन्यावर घ्यायचो. शेवटी एक दिवस जनता कर्फ्यू ची बातमी कानावर आली, आणि ती नेमकी रविवारी होती. म्हणून मग मी असे ठरवले की शनिवारी नाशिक ला अात्त्याकड़े जाव आणि सोमवारी पहाटेच्या ट्रेन ने परत मुंबई! आणि त्या वेळी सुद्धा घरचे बोलवत होते, नाशिक ला जाण्याऐवजी घरी ये, पण मी ते नाही ऐकले आणि ठरल्या प्रमाणे मी नाशिक ला आलो तर खर, पण रविवारी दूसरी बातमी, की 'महाराष्ट्रमधे लॉक डाउन' ही बातमी ऐकून जरा जाग आली, आणि पाहिले तर काय कोरोना बाधितांची संख्या खूपच वाढलेली होती, त्यात सवार्धिक मुंबई मधे, त्यात १० ते १२ दिवसांसाठी लॉक डाउन, हे सगळ पाहुन seriously घ्यायला हवं हे मात्र कळालं, कारण कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासमधे पहिल्या वेळेस असे घडले असेल की मुंबई ची राणी जिला लोकल म्हंटल जातं ती एवढ्या दिवस बंद आहे! त्यानंतर बरेचशे लोक जागे झाले आणि प्रशासनाने घरात बसन्याच्या सूचना दिल्या! त्या ही नंतर त्या सूचनांचे पालन पाहिजे तीतके काटेकोरपने केले नाही. आणि थोड्याच दिवसात एक आणखी मोठी बातमी 'संपूर्ण भारत २१ दिवसांसाठी लॉक डाउन करण्यात येत आहे, कृपया कोणीही २१ दिवसांसाठी घराबहेर निघु नये'!
        हे ऐकून मात्र तोंड च पानी पळालं आणि मी ना घरी ना मुंबईमधे , मात्र मधेच अड़कून पडलो!
       
        पण हा जो कोरोना आहे, यामुळे प्रचंड धुमाकुळ माजलेला आज दिसत आहे. त्याकडे आपण बघतच आहोत. पण आजही त्याला काही लोक गांभीर्याने कुणी घ्यायला तयार नाही. तर माझी त्या सर्वाना विनंती आहे की कृपया प्रशासनाने जे नियम घातले आहे ते सर्व आपल्यासाठी आहेत, आणि त्याचे आपन पालन करू.  
        कारण कुणाचा नवरा, कुणाची बायको, कुणाचे आई वडील, कुणाचे मुले आज या कोरोना मुळे वेग वेगळी आहेत, आपले प्रशासन, डॉक्टर्स आणखी खुप काही लोक आपल्यासाठी, देशसाठी लढत आहेत त्यांना लक्षात घेऊन आपण घरात बसु, खरतर हा खुप मोठा चान्स आहे आपल्याला देशभक्ति करण्याचा!
        बऱ्याच जनांचा प्रश्न आहे की इतके दिवस घरी राहून काय करायचे, तर त्यात एकच सांगेल की जे ही बाहेर राहून आपल्यासाठी झूंजत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा! आणि या संकटातून संपूर्ण जगाला लवकरात लवकर आपण  बाहेर निघु अशी अपेक्षा बाळगा!

        "ये दिन भी निकल जाएंगे"


                         --  ग. सु. डोंगरे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

संघर्ष