मुक्तांगनी मी धन्य झालो...!

मुक्तांगणी मी धन्य झालो...!

ना मला कळले कधी व्यसना मधी मी डूंबलो,
एक प्याला त्या विशाचा नकळत मी प्यायलो...!

ना कधी चिंता मनाची, ना कुणाची ओढ़ झाली,
फक्त स्वार्थावाचुनिया माझ्या, घोटावर घोट घेत गेलो...!

पांगळा पुरुषार्थ माझा, मज कधी कळलाच नाही,
पांघरूनी त्या चुकाणा मी नशा करवित गेलो...!

बांधुनी भूतकाळ माझा, सोसु कशा मी यातना,?
या आशा व्यसनी जीवाला रोखु कसा मी सांगना...!

जानिले मी दुःख त्यांचे अन पूर्ण केल्या कामना,,,
मग शांत चित्त अन तन मन धनाने, मुक्तांगनी मी धन्य झालो...!

                              -  ग. सु. डोंगरे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!