जिंदगी.....!
भूक लागल्या जिवाला कोणी घास बी देईना,,
तान्ह लागल्या पिलाला कोणी पाणी बी पाजीना....!
भर उन्हात रं माझ्या, या बापाच्या कष्टाला,
देव कोपुन बसला, थोड़ा भाव बी देईना....!
ओली आंम्बी ती हळद, देती माराला इलाजं,,,
तसा शेताला बी का रं काही इलाजं मिळना.....!
पाप-पुन्न्याच्या खेळातं, झाली जीवाची काहिली,,,,
दोन घास सुखाचे रं जग खाउबी देइना....!
जीव तरासला समदा, उर भरुनिया आला,,
लाऊ गळाला या फास, पर हिम्मत होईना....!
-- ग. सु. डोंगरे
Comments
Post a Comment