रे पाखरा...! (नकारात्मक)

रे पाखरा...!

रे पाखरा पाखरा,,,
घे उंच तू भरारा....।
नाही ठेवला इथे तुला,,,
कोणीच रे निवारा.....।।

रे पाखरा पाखरा,,,,
जा पाहाडाच्या मंधी....।
इथे तोडतायेत,,,,
सगळे झाडाची ती फांदी....।।

रे पाखरा पाखरा,,,,
बघ तू आता पळवाटा....।
इथली जनता विषारी,,,,
झाली बाभूळाचा काटा...।।

रे पाखरा पाखरा,,,
तू होरे इथून फरार...।
हि माणसे राक्षस,,,,
देतील निरोप तुला अखेर.....।।

                 -- ग. सु. डोंगरे
                (8605522285)

Comments

Popular posts from this blog

बरेच दिवस झाले

The Silent War...

आई चे अश्रु....!