रे पाखरा...! (सकारात्मक)

रे पाखरा.....!

रे पाखरा पाखरा,,,
मन घुंगरू रे झालं...।
बघ माझ्या शेतामंदी,
कस हिरवं वाण आलं....।।

रे पाखरा पाखरा,,,
ये माझ्या तू अंगानी...।
तुपा दुधात माखून,
तुला देईल चारा पाणी.....।।

रे पाखरा पाखरा,,,
किती गोड तुझा आवाज...।
जसे संगीताचा सूर,,,
आणि कंठाला सोनेरी साज....।।

रे पाखरा पाखरा,,,
तू उनाड किती रे.....।
माझे मन हि तुजसे,,,,,
घेते धाव चोही रे.....।।

रे पाखरा पाखरा,,,,
सौंदर्य तुझं अप्रतिम....।
जंगलातल्या सुळसुळणाऱ्या,,,,
नागाची जशी चमचमती कातीन....।।

                -- ग. सु. डोंगरे

              ( ८६०५५२२२८५)

Comments

Popular posts from this blog

आई चे अश्रु....!

The Silent War...

बरेच दिवस झाले