पणतीतला दिवा तो, मज साथ देत आहे....!


पणतीतला दिवा तो
उजेड देत आहे,,
मार्गावरी ही माझ्या
मज साथ देत आहे...!

गेली पळून भीति
नादान या जीवाची,,,
रात्री अमावसेच्या
प्रकाश देत आहे...!

नथांबनार मि आता
पर्वा ना कुणाची,,,
लेखनी हाती माझ्या
ती शब्द देत आहे.....!

शब्दात शब्द मांडुन
करू सैर या जगाची,,,,,
जग व्यर्थ जीवनाचा
मज अर्थ देत आहे.....!

                             -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

आई चे अश्रु....!

The Silent War...

बरेच दिवस झाले